Home भद्रावती क्राईम :- भद्रावती तहसीलदारांनी पकडलेला रेतीचा ट्रक दुसऱ्या दिवशी सोडला ?

क्राईम :- भद्रावती तहसीलदारांनी पकडलेला रेतीचा ट्रक दुसऱ्या दिवशी सोडला ?

कंडोली ग्रामपंचायत मधील मामा तलावातून माती उत्खननाचा आदेश रद्द केल्यानंतर सुद्धा संबंधितांनी केले माती उत्खनन,पोलीस कारवाई का नाही ?

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती तहसीलदार सोनवणे व नायब तहसीलदार भान्दककर या दोघांनीही तालुक्यातील अवैध रेती, माती व खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांकडून चिरीमिरी घेऊन राष्ट्रीय संपतीची खुलेआम लूट चालवली असल्याचे विदारक द्रुश्य दिसत असून चक्क तहसीलदार यांच्या घराजवळ बनावट टीपी असलेल्या रेतीच्या ट्रक ला पकडल्या नंतर तो दुसऱ्या दिवशी त्यांनी सोडल्याने तहसीलदार सोनवणे यांना मोबदला घेऊन ती ओरिजनल टीपी असल्याचा साक्षात्कार तर झाला नसावा? अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान कंडोली ग्रामपंचायत मधील मामा तलावातून माती उत्खननाचा आदेश रद्द केल्यानंतर सुद्धा संबंधितांनी जोरजबरदस्तीने माती उत्खनन केल्यानंतर सुद्धा तहसीलदार सोनवणे यांनी पोलीस तक्रार करून कारवाई का नाही ? असा सवाल विचारल्या जातं आहे.

भद्रावती येथील तहसीलदार ज्या परिसरात राहतात त्या जवळील गुलाब ठवसे यांच्या घरी MH34-BZ5558 या क्रमांकाचा हायवा ट्रक दिनांक 9 जून 2023 ला दुपारी 3.00 च्या सुमारास खाली होतांना चक्क तहसीलदार यांनी बघितला व त्यांनी त्याच वेळी तो ट्रक टीपी मध्ये खोडखाड असल्याने व बनावट टीटी असल्याची खात्री झाल्याने तो ट्रक तहसील कार्यालयात जमा केला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी तो ट्रक सोडून दिला, त्यामुळे तहसीलदार सोनवणे हे आपल्या कर्तव्यास कसा कसूर करतात व राष्ट्रीय संपतीच्या चोरित आपला कसा सहभाग नोंदवतात हे दिसून येते. तहसीलदार यांचे राष्ट्रीय संपती चोरित सहभागी असल्याचे एकच प्रकरण नाही तर नायब तहसीलदार भान्दककर यांच्या माध्यमातून होणाऱ्या माती, गौण खनिज उत्खनन व रेती उत्खनन आणि वाहतूक यातून होणाऱ्या राष्ट्रीय संपतीच्या चोरित सुद्धा यांचा हिस्सा असल्याचे दिसत आहे.

भद्रावती तालुक्यातील कंडोली या गावांतील सामाजिक कार्यकर्ते गणेश जिवतोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मामा तलावाचे उत्खनन करण्याची परवानगी देणाऱ्या नायब तहसीलदार भान्दककर व तहसीलदार सोनवणे यांच्या बेकायदेशीर माती उत्खनन परवानगीचा पर्दाफाश केला व त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे. मात्र अगोदरच मामा तलावाची क्षमता नसतांना 1300 ब्रॉस माती उत्खननाचची परवानगी देणारे तहसीलदार व नायब तहसीलदार त्या बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्याला खुली सूट देत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून यावर प्रतिबंध करण्यासाठी गणेश जिवतोडे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला व त्यामुळे तहसीलदार यांनी या नंतर माती उत्खनन करण्यावर बंदी आणली.

तहसीलदार व नायब तहसीलदार देशद्रोह करतात तर कारवाई होणार ?

तहसीलदार यांचा माती उत्खनन करण्यावर बंदीचा आदेश असतांना शनिवार रविवार या सुट्टी च्या दिवशी व पहाटे सकाळी तेथून माती उत्खनन होत असल्याची तक्रार असतांना व स्वतः महसूल यंत्रणा यांनी मौका चौकशी करून ते शिद्ध केले असतांना तहसीलदार सोनवणे हे अवैध माती उत्खनन केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार का देत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी माती टाकण्यासाठी दोघांना वेगवेगळी माती उत्खननाची परवानगी देण्यामागचे काय राज आहे ? हे कळायला मार्ग नसून राष्ट्रीय संपत्तीची चोरी होऊ नये यासाठी ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तेच चोरांना संरक्षण देत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर देशद्रोहा सारखा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. भद्रावती तालुक्यात सकाळी पहाटे व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रेती व गौण खनिजं उत्खनन व वाहतूक होतं असतांना तहसीलदार व नायब तहसीलदार यांचा मोबाईल मात्र बंद असतो याचा अर्थ यांची मूक संमती असल्याने या  गंभीर प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here