Home वरोरा दखलपात्र :- वरोरा तालुक्यातील कोसरसार या गावांतील उपसरपंच अमित बहादुरेचा भ्रष्टाचार.

दखलपात्र :- वरोरा तालुक्यातील कोसरसार या गावांतील उपसरपंच अमित बहादुरेचा भ्रष्टाचार.

ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना दिले मनसेने निवेदन.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील कोसरसार ग्रामपंचायतचे उपसरपंच अमित बहादुरे यांनी तत्कालीन ग्रामसेवक यांचेवर दबाव आणून 15 व्या वित्त आयोगाच्या पैशातून जवळपास 13 लाख रूपयांची उचल सन 2020-21-22 पर्यंत केली असल्याची बाब माहिती अधिकार अंतर्गत घेतलेल्या कागदपत्रातून स्पष्ट झाल्याने त्यांच्या या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी उपसरपंच बहादुरे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी मनसेचे राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ग्रामपंचायत उपसरपंच बहादुरे यांनी 15 व्या वित्त आयोगाची उचल करण्यात आलेली ही रक्कम उपसरपंच यांचे ड्रायव्हर, ऑपरेटर व मित्र यांचेच नावाने असल्याचे BANK STATEMENT मध्ये आढळून आले आहे. एवढेच नव्हे तर 25000/- रू. ची रक्कम दि. 17/08/2021 ला स्वतः अमित बहादूरे यांचे नावाने उचल केलेली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार 15 वित्त आयोगाच्या पैशातून चेकव्दारे रकमा उचल करता येत नसतांना स्वतः उपसरपंच यांचे नावाने उचल झालेली आहे.उपसरपंच बहादुरे यांनी तत्कालीन ग्रामसेवक दुर्गे यांच्यावर दबाव आणून पैसा उचलला आहे, BANK STATEMENT बघता निर्दर्शनास येत आहे की, उपसरपंच यांनी तत्कालीन ग्रामसेवक दुर्गे यांचेवर दबाव आणून हा पूर्ण भ्रष्ट्राचार केलेला आहे. तरी या पुर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करून व त्यांचेवर फौजदारी कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अन्यथा गावांतील नागरिकांना घेऊन आपल्या प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here