Home चंद्रपूर घुग्घुस येथील आगीत जळालेल्या दुकानांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

घुग्घुस येथील आगीत जळालेल्या दुकानांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-घुग्घूस येथील जामा मस्जिद समोर असलेल्या अल – रजा कॉम्प्लेक्स मधील इस्लामीक बुक हाउस व येथीलच कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जळलेल्या दुकानांची पाहणी करुन आगी मागचे कारणाची माहिती घेतली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूस युवा नेते इमरान खान, स्वप्नील वाढई, नागेश तुराणकर, राजू नातर, राजू सूर्यवंशी, आकाश चिलका, मयूर कलवल, विक्की सोदारी, भोंगडे आदींची उपस्थिती होती.
मंगळवारी रात्रोच्या सुमारास अल – रजा कॉम्प्लेक्स मधील इस्लामीक बुक हाउुस व येथीलच कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. काही तासाच्या परिश्रमा नंतर सदर आगीवर नियत्रंण मिळविण्यात आले. मात्र तोवर दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळाल्या नंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथे जळालेल्या दुकानाची पाहणी केली. यावेळी दुकानमालकांसोबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी चर्चा करुन आगीमागचे कारण समजून घेतले. शॉट सर्किट झाल्याने सदर आग लागली असावी असा प्राथमीक अंदाज वर्तविल्या जात आहे.

Previous articleआजपासून महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस ! तुमच्या जिल्ह्यात पडणार की नाही ?
Next articleलक्षवेधी :- मोदी सरकारचा बैंकांच्या माध्यमातून नागरिकांच्या पैशावर दरोडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here