Home Breaking News आजपासून महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस ! तुमच्या जिल्ह्यात पडणार की...

आजपासून महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस ! तुमच्या जिल्ह्यात पडणार की नाही ?

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

Maharashtra Rain  :-   गेल्या जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात उसंत घेतलेल्या पावसाची वापसी झाली. 23 जून पासून राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पाऊस सुरु झाला. मध्यंतरी विदर्भात देखील थोड्याफार भागात जोरदार पाऊस झाला. या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.

मात्र जून महिन्यात समाधानकारक असा पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळाला नाही. मात्र जुलै महिन्यात विशेषता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यासोबतच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु झाला आहे.

यामुळे सध्या संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची शेत शिवारात आपल्या परिवारासमवेत पेरणीसाठी तसेच पेरणीनंतरच्या कामांसाठी धावपळ पाहायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटपली आहेत. काही ठिकाणी निंदनीची

कामे सुरू आहेत. कुठे शेतकरी बांधव कोळपणी सारख्या अंतरमशागतीची कामे करत आहेत.

अशातच भारतीय हवामान विभागाने आज सात जुलै रोजी राज्यातील 19 जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यासंबंधीत जिल्ह्यांना हवामान विभागाच्या माध्यमातून ऑरेंज अलर्ट तसेच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD ने सांगितल्याप्रमाणे, मान्सूनचा आस दक्षिणेकडे आला असून किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात आज पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असे IMD ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कोकणाचा विचार केला तर आज उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार ते मुसळधार

पाऊस या जिल्ह्यात पडणार असा अंदाज आहे.

सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. विदर्भातही पाऊस पडणार आहे, विदर्भ विभागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता IMD ने वर्तविली आहे.

कोणत्या जिल्ह्यासाठी ऑरेंज, कोणत्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट ?

आज पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

 

Previous articleप्रवास्यांच्या सुरक्षतेसाठी प्रवासी वाहतूक बसेसची योग्य तपासणी करा – आ. किशोर जोरगेवार
Next articleघुग्घुस येथील आगीत जळालेल्या दुकानांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here