Home चंद्रपूर मनसेच्या विधी विभागाच्या राज्य चिटणीस पदी अँड मंजू लेडांगे यांची नियुक्ती.

मनसेच्या विधी विभागाच्या राज्य चिटणीस पदी अँड मंजू लेडांगे यांची नियुक्ती.

स्थानिक जिल्हा स्थरावर पक्षाच्या माध्यमातून केलेल्या जनहिताच्या कार्याची वरिष्ठांनी घेतली दखल.

चंद्रपूर :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी विभाग जिल्हाध्यक्षा मंजू लेडांगे यांनी त्यांच्या अल्पशा काळात चंद्रपूर शहरासह ग्रामीण जनतेच्या विविध समस्या बाबत व प्रशासनातील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला आणि प्रसंगी आंदोलन सुद्धा केले त्यामुळं जनसामान्य जनतेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल एक लढवय्यी राजकीय संघटना म्हणून चांगले मत निर्माण झाल्याने अँड मंजू लेडांगे यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे, दरम्यान वरिष्ठांनी याबाबत अँड मंजू लेडांगे यांना राज्य पातळीवर राज्य चिटणीस म्हणून नवी जबाबदारी दिली आहे.

अँड मंजू लेडांगे यांचा राजकीय प्रवास हा वादळी झाला. त्यांच्या वर्षभरातील मनसेच्या विधी विभाग जिल्हाध्यक्षा म्हणून कारभाराची सर्वत्र चर्चा झाली त्यात वेकोलिचा सीएसआर फंड घोटाळा, वेकोलिच्या ट्रांसपोर्ट ओबी कंपनीच्या अरेरावी विरोधात आंदोलन लक्षवेधक राहिले. नुकताच त्यांनी जिल्ह्यात “सशक्त नारीशक्ती सुरक्षा सल्ला सन्मान उपक्रम” राबवून हजारो महिलांच्या समस्या मोफत सोडवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या त्यांच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळतं असल्याने अल्पावधीतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्याच्या संखेत लक्षणीय वाढ झालेली आहे.

अँड मंजू लेडांगे यांची मनसेच्या विधी विभागाच्या राज्य चिटणीस पदी नियुक्ती झाल्याने मनसेचे जनहित विधी कक्ष विभाग राज्य सरचिटणीस महेश जोशी, मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी, शहर अध्यक्ष विजय तुर्क्याल, पीयूष धुपे इत्यादीनी अभिनंदन केले आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here