Home चंद्रपूर इंदिरा नगर प्रभागतिल शाळेला 5 कोटी चा विशेष निधी उपलब्ध करा- युवा...

इंदिरा नगर प्रभागतिल शाळेला 5 कोटी चा विशेष निधी उपलब्ध करा- युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे,आप

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  आज दिनांक १०,०७,२०२३, ला इंदिरानगर महानगरपालिका अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश माध्यमिक शाळा आहे. या शाळेची इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. मात्र पालिका कडून डागबुजी व थातुर मातुर काम करुण ही शाळा चालवत आहे व येथील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात टाकत आहे.येथील शाळेला प्रतक्ष भेट देऊन याची पाहणी केली असता संतोष बोपचे यांनी तात्काळ या वर मार्ग काढण्यासाठी मनपा कार्यालय गांठत नवीन इमारत बांधकाम करिता पाच कोटीचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावे या करिता निवेदन देण्यात आले. सोबत योग्य शिक्षकाची भरती करण्यात यावी व उच्च दर्जाचे शिक्षण व्यवस्था देण्यात यावे अशी मागणी येथील मनपा आयुक्त यांना निवेदनातून करण्यात आली. या वेळेस आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर सचिव राजू कुडे, शहर सहसचिव सुधीर पाटील, शहर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, पवन प्रसाद, अनुप तेलतुंबडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमनसेच्या विधी विभागाच्या राज्य चिटणीस पदी अँड मंजू लेडांगे यांची नियुक्ती.
Next articleखळबळजनक:- चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here