Home चंद्रपूर खळबळजनक:- चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांची आत्महत्या

खळबळजनक:- चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांची आत्महत्या

डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्याप्रमाणं डॉ. अग्रवाल यांनी सुद्धा इंजेक्शन घेऊन कां केली आत्महत्या ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. उमेश अग्रवाल (48) यांनी आपल्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने आरोग्य जगतात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं आनंदवन येथील पद्मश्री बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांनी सुद्धा इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले होते.

शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या चर्चच्या अगदी समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचे Sai Eye Clinic हॉस्पिटल आहे.त्यांचे घर पण त्याचं इस्पितळावह्या वरती आहे. दरम्यान काल रात्रीचे ठीक आठ वाजता एक रुग्ण आला असता डॉक्टरांना बोलावण्यासाठी अटेंडेंटने घरी असलेल्या डॉक्टरांना हाक दिली पण आवाज ऐकू येत नसल्याने त्यांनी बेडरूम मधे बघितले असता डाॅ. अग्रवाल आपल्या बेडरूम मधे झोपून असल्याचे दिसले तेंव्हा त्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा श्वास बंद झाल्याचे दिसले तेंव्हा त्यांनी जोराची किंकाळी फाडली आणि डॉ. अग्रवाल च्या समोर असलेल्या डॉ. शिरीष चौधरी यांना बोलावले असता ते मरण पावले असल्याचे जाहीर केले. यावेळी इंजेक्शन डॉ. अग्रवाल च्या उशाशी पडून होते यावरून ते इंजेक्शन घेऊन डॉ. अग्रवाल यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले. सूत्रांच्या माहितीनुसार डॉ. अग्रवाल मानसिक रोगाने पीड़ित होते.

Previous articleइंदिरा नगर प्रभागतिल शाळेला 5 कोटी चा विशेष निधी उपलब्ध करा- युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे,आप
Next articleरेती घाट प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक व जामीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here