Home चंद्रपूर रेती घाट प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक व...

रेती घाट प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक व जामीन

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  सध्या रेती घाट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आता हेस रेती चंद्रपुरातील रेती ठेकेदाराच्या जीवावर बेतत आहे. कमी दरात रेती का टाकतोस म्हणून विचारणा करणाऱ्या कंत्राटदार ठेकेदार जितू चावला यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांनी वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे रविवारी सायंकाळी धक्काबुक्की करून मारहाण केली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांना अटक करून चारचाकी वाहन जप्त केले. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे.चावला हे रेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांची वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे भेट घेत, ‘तुम्ही कमी दरात रेती का टाकता,’ असा प्रश्न केला. यावरून चौघांमध्ये वाद निर्माण झाला. गिऱ्हे, ठाकूर,बेले, तिघांनी चावला यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यानंतर ते तिथून निघून गेले. चावला यांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंद केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करत आहे.

Previous articleखळबळजनक:- चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांची आत्महत्या
Next articleआश्चर्यच :- आता काठावर पास होणारा उमेदवार पण होणार पोलीस पाटील?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here