Home वरोरा बेकायदेशीरपणे माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचे बांधकाम पाडणाऱ्या अभियंता पुनवटकरला निलंबीत करा.

बेकायदेशीरपणे माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचे बांधकाम पाडणाऱ्या अभियंता पुनवटकरला निलंबीत करा.

मनसेची जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी.

वरोरा प्रतिनिधी:-

वरोरा नगरपरिषदचे अभियंता यांचे भ्रष्ट कारनामे नेहमीच चर्चेचा विषय बनत असतांना आता त्यांनी चक्क कायदा हातात घेऊन व पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनाची दिशाभूल करून माजी सैनिक होमदास इंगोले यांच्या विधवा पत्नी रेवती होमदास इंगोले व आशीर्वाद नगर येथील रत्नाकर तात्याजी खामनकर यांना कायदेशीर नोटीस व सूचना न देता बेकायदेशीरपणे अतिक्रमण तोडल्याने वरोरा नगरपरिषद अभियंता पुनवटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी व वरोरा नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांच्याकडे मनसे पदाधिकारी यांनी केली आहे.

वरोरा नगरपरिषद चे शहर अभियंता सूरज पुनवटकर हे मागील अनेक वर्षांपासून इथे कार्यरत असून त्यांनी आजूबाजूच्या भांडणाचा फायदा घेऊन त्यापैकी एका व्यक्तीकडून (तक्रारकर्ता) लाच घेऊन दुसऱ्या कित्तेक बांधकामावर बेकायदेशीररीत्या कारवाई केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशातच सलीम नगर अंबादेवी वार्ड येथील माजी सैनिक होमदास इंगोले यांच्या विधवा पत्नी रेवती इंगोले व आशीर्वाद ले आऊट टिळक वार्ड येथील रत्नाकर खामनकर यांच्या बांधकामामुळे कुठलीही अडचण नसतांना व येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर कुठलाही अडथळा नसतांना त्यांनी अनुक्रमे अशोक गोटे व सुशील यादवराव काळे यांच्याकडून लाच घेऊन व सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेऊन दिनांक 30 जून ला अभियंता पुनवटकर यांनी बांधकाम तोडले.

खरं तर कुठलेही बांधकाम तोडताना नगरपरिषद कडून किमान 6 महिन्यांपूर्वी, तीन महिन्यांपूर्वी नोटीस देऊन अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना बांधकाम काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ देणे अपेक्षित आहे. शिवाय पावसाळ्यात कुठलेही अतिक्रमण काढण्यास कायद्यानुसार मनाई आहे. असे असतांना केवळ स्वतःच्या अर्थपुर्तिसाठी नगरपरिषद अभियंता सूरज पुनवटकर यांनी तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून जे अतिक्रमण काढले ते कायद्याचे अवमूल्यन करणारे असल्याने या प्रकरणी अभियंता पुनवटकर यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा शहरातील जेवढ्या लोकांवर अन्याय झाला त्या सर्वांना सोबत घेऊन नगरपरिषद समोर मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, महिला तालुका अध्यक्षा रेवती इंगोले, प्रतीक मुडे, सूरज मानकर रत्नाकर खामनकर व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वरोरा नाका उडान पुल मधील मोठं मोठें गडे देत आहे अपघाताचे निमंत्रण
Next articleमनसेच्या विधी विभागाच्या राज्य चिटणीस पदी अँड मंजू लेडांगे यांची नियुक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here