Home चंद्रपूर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वरोरा नाका उडान पुल मधील मोठं मोठें गडे देत...

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वरोरा नाका उडान पुल मधील मोठं मोठें गडे देत आहे अपघाताचे निमंत्रण

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर मधील वरोरा नाका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उडानपूल हा चौक कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध आहेस.कारण इथे कधी एक्सीडेंट होतात तर कधी झगडे आणि आता या वरोरा नाका चौक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरून नागपूरकडून येणारे नागरिक बल्लारशा,तुकुंम, बंगाली कॅम्प,व दुर्गापूर,जाणारा एक मार्ग आहे. आणि तिकडूनच येतांना तुकुंम,राजुरा,जुनोना,मुल,बंगाली कॅम्प,दुर्गापूर,या परिसरातील नागरिक वरोरा भद्रावती नागपूर या रोडाने जात असतात परंतु या मार्गाने आता जाणे म्हणजे स्वतःच्या जीवाला अपघाताचे नियंत्रण देणे झालेले आहे.कारण या पुलावरील रस्त्यावर इतके मोठ मोठे खड्डे झालेले आहे की ट्रक, व फोर व्हीलर तर सोडा साधे टू व्हीलर सुद्धा जाणाऱ्यांची पंचायत झालेली आहे.आणि महत्त्वाची बाब म्हणजे यास उडान पुलावरून येथील प्रसिद्ध जनता कॉलेज,गव्हर्मेंट आयटीआय आणि आंबेडकर कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करत असतात आणि इतक्या मोठ्या रहदारीच्या हा उडानपूल असतानी सुद्धा चंद्रपूरातील प्रशासन आणि पीडब्ल्यूडी चे अधिकारी झोपेत आहे.की काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे. विशेष बाब म्हणजे याच रोडावरून कित्येक राजकारणी व आजी माजी नगरसेवक सुद्धा ये जा करत असतात परंतु चंद्रपुरातील इतक्या मोठ्या उडान पुलावरील मोठमोठ्या खड्ड्याकडे कोणाचे लक्ष कसे वेधले नाही किव्हा वेदत नाही हे येथील नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. आणि आता तर पावसाचे दिवस चालू आहे.आणि पावसाच्या दिवसात या गड्यामध्ये पाणी साचलेले असतात त्यामुळे येथील येजा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकून या उडान पुलावरून प्रवास करावा लागत आहे. परंतु येथील प्रशासनाचे किंवा अधिकाऱ्याचे लक्ष कोणत्याही प्रकारचे जिवंत हानि होण्याच्या पहले जाणार की नाही यांच्या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Previous article“एक सही संतापाची,” मनसेचे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वरोरा येथे अभिनव आंदोलन,
Next articleबेकायदेशीरपणे माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचे बांधकाम पाडणाऱ्या अभियंता पुनवटकरला निलंबीत करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here