Home वरोरा “एक सही संतापाची,” मनसेचे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वरोरा येथे अभिनव आंदोलन,

“एक सही संतापाची,” मनसेचे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वरोरा येथे अभिनव आंदोलन,

महाराष्ट्राच्या राजकारण्यानी गद्दारी करून पक्षांवर दावा केल्याने  मनसेने अभिनव आंदोलनातून केला प्रहार,

वरोरा :-

महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे चिखल झालं आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी हे आपला स्वाभिमान गहाण ठेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षात जातं आहे, त्याबद्दल जनसामान्य माणसात मोठा संताप व्यक्त होताना दिसत आहे, तो संताप राज्य पातळीवर जावा व सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून द्यावी या हेतूनं व महाराष्ट्राच्या विकासाबद्दल लोकजागृती करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून “एक सही संतापाची.” हे अभिनव आंदोलन वरोरा येथे आज दिनांक 8 जुलै ला सकाळी 11.45 ला घेण्यात आले.

स्थानिक गांधी चौक वरोरा येथे घेतलेल्या या अभिनव आंदोलनात नागरिक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, यावेळी उपस्थित नागरिकांकडून मनसेच्या तयार केलेल्या स्वाक्षरी मोहीम च्या एक सही संतापाची लिखित कागदावर सह्या घेण्यात आल्या. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी राज्यातील पक्षांतर करणाऱ्या व पक्षात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांसह लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. या प्रसंगी मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के. प्रशांत बदकी, प्रतीक मुडे, सूरज मानकर यांच्यासह मनसे महिला तालुका अध्यक्षा रेवती इंगोले व शहरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Previous articleलक्षवेधी :- मोदी सरकारचा बैंकांच्या माध्यमातून नागरिकांच्या पैशावर दरोडा.
Next articleस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वरोरा नाका उडान पुल मधील मोठं मोठें गडे देत आहे अपघाताचे निमंत्रण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here