Home चंद्रपूर सेवानिवृत्त तारा लिंगायत (बोरकर) यांचा विविध ठिकाणी सत्कार व निरोप समारंभ

सेवानिवृत्त तारा लिंगायत (बोरकर) यांचा विविध ठिकाणी सत्कार व निरोप समारंभ

आरोग्य विभागातील अमूल्य योगदानाबद्दल सेवानिवृत्ती वेळी तारा लिंगायत यांचा झालेला सत्कार मन भारावून टाकणारा ठरला.

चंद्रपूर :-

वरोरा पंचायत समिती येथून आरोग्य विस्तार अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या तारा भगवान लिंगायत (बोरकर) यांचा नुकताच त्यांच्या 37 वर्षांच्या अमूल्य आरोग्य सेवेच्या योगदानाबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरगांव ( खडी)च्या वतीने सेवानिवृत्तीच्या दिवशी सत्कार व निरोप समारंभ डोंगरगांव (खडी)येथे थाटात संपन्न पार पडला. दरम्यान आरोग्य सेवेच्या प्रदीर्घ काळाच्या आठवणीने अनेकांचे मन गहिवरले असल्याचे चित्र दिसत होते.

तारा लिंगायत (बोरकर )यांनी आरोग्य विभागामध्ये 37 वर्षे प्रदिर्घ काळ सेवा पूर्ण केली, त्यांच्या त्या आरोग्य सेवा कार्याचा गौरव करण्यासाठी डोंगरगांव (खडी)प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ च्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरगांव (खडी)चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल कातकर तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.सम्यका भगत , सत्कार मुर्ती सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी तारा लिंगायत (बोरकर), सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यीका शारदा बोरकर , इंजिनिअर चेतना लिंगायत, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.सोनाली सोनी , सामुदायिक आरोग्य अधिकारी अनुश्री पिंपळकर , सामुदायिक आरोग्य अधिकारी उमेश नागरगोदे,पत्रकार गांधी बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या वेळी मंचावरील सर्व मान्यवरांनी सत्कार मुर्तीच्या जीवनावर प्रकाश ज्योत टाकला व पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले.सत्कार समारंभामध्ये सत्काराला उत्तर देताना सत्कार मुर्ती तारा लिंगायत (बोरकर)यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरगांव (खडी)व पंचायत समिती वरोरा येथिल अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल कूतज्ञता व्यक्त करून दिलेले प्रेम , मानसन्मान व सेवा कालावधीत केलेले सहकार्य कधीही विसरणार नाही असे भावनिक मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक प्रमोद ढोणे, प्रास्ताविक आरोग्य सेविका एम.डी.किल्लेकर ,तर आभारप्रदर्शन प्रयोगशाळा तंत्रज्ञ विवेक बोकडे यांनी केले . कार्यक्रमाला आरोग्य सेवक ऒ.डी.पोपटे , आरोग्य सेविका ढाले ,के.सी.मोहितकर , लिपिक प्रकाश तुरानकर, डाटा एन्ट्री ऑपरेटर स्नेहा गेडाम , दिपक कांबळे,रवि पचारे ,व्हि.जी. चार्लीकर ,मयुर बिरीया ,सामुदायिक आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , आरोग्य सेविका मदतनीस ,गटप्रवर्तक इत्यादी कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डोंगरगांव (खडी)प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱी सत्कार कार्यक्रमात तारा लिंगायत (बोरकर)यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे , महिला व बाल कल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी संग्राम शिंदे इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleधारीवालमधील कामगार अधिकारी व कंत्राटदार अशा एकूण १५२ जणांनी केले विक्रमी रक्तदान
Next articleमोबाईल मुळे गेला चार मित्राच्या जीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here