Home Breaking News मोबाईल मुळे गेला चार मित्राच्या जीव

मोबाईल मुळे गेला चार मित्राच्या जीव

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

नागभीड  :-  आज शेगाव येथील काही युवक चिमूर तालुक्यातील मुक्ताबाई येथे धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी शेगाव येथून सकाळी दहा वाजता दरम्यान घरुर निघाले होते, परंतु मुक्ताबाई धबधब्या परिसरामध्ये दोन दिवसा अगोदर डोमा येथील रहिवाशी डोमाजी सोनवणे यांच्या वाघाच्या हमल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली….

आज मुक्ताबाई धबधबा वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून काही दिवसाकरीता बंद करण्यात आला असल्याने सदर युवक मुक्ताबाई येथून नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव येथे गेले असता सेल्फीच्या नादात एक जण घसरून पडला असता त्याला वाचवण्याच्या नादात त्याच्या मागे तिघेजण पडले असुन चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांचे नाव व वय मनीष श्रीरामे 26, धीरज झाडे 27, चेतन मांदाळे 17, राहणार शेगाव,संकेत मोडक 25, हे चारही मुले चिमूर तालुक्यातील गिरोला येथील रहिवाशी आहे. घटनास्थळावर नागभीड पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित असून शोध मोहीम कार्य सुरू आहे.

Previous articleसेवानिवृत्त तारा लिंगायत (बोरकर) यांचा विविध ठिकाणी सत्कार व निरोप समारंभ
Next articleखळबळजनक:-देशी दारू दुकानाच्या मुतारी जागेत बाबासाहेबांच्या फोटो बैनेरवर सु ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here