Home चंद्रपूर खळबळजनक:-देशी दारू दुकानाच्या मुतारी जागेत बाबासाहेबांच्या फोटो बैनेरवर सु ?

खळबळजनक:-देशी दारू दुकानाच्या मुतारी जागेत बाबासाहेबांच्या फोटो बैनेरवर सु ?

संतप्त युवकांनी तुकुम वसंत नगर येथील जयस्वाल च्या दारू दुकानावर केला हल्लाबोल.

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यात देशी विदेशी दारू दुकानाचा भडिमार झाला असुन दारूच्या पैशांनी मस्तावलेले राष्ट्रपुरुषांचा पण अपमान आणि त्यांची धिंड काढायला लागले की काय असाच संतप्त प्रकार समोर आला असुन शहरातील तुकुम वसंत नगर येथील जयस्वाल च्या देशी दारू दुकानाच्या मुतारी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या बैनेर वर मैद्यशौकिन मुतत असल्याचा खळबळजनक प्रकार आज सायंकाळी समोर आला आहे. एका व्यक्तीने याचा विडियो काढला आहे पण त्यां विडियो मधे त्यांनी चुकून तुकुम ऐवजी भद्रावतीचाउल्लेख केला आहे.दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आपला संताप व्यक्त करत देशी दारू दुकानावर हल्लाबोल केला आहे.

सदर घटनेचे फोटो आणि व्हीडिओ आता व्हायरल झाले असुन कोटेश्वरी गोहने नामक सामाजिक कार्यकर्ती हिने पोलीस स्टेशन गाठून देशी दारू दुकान मालक जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या आक्रोशानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेले बैनेर हटवले गेले आहे. आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Previous articleमोबाईल मुळे गेला चार मित्राच्या जीव
Next articleसावधान :- भद्रावती बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अंगणवाड्या मदतनीस भरतीत अफलातून घोटाळा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here