Home भद्रावती सावधान :- भद्रावती बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अंगणवाड्या मदतनीस भरतीत अफलातून घोटाळा?

सावधान :- भद्रावती बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अंगणवाड्या मदतनीस भरतीत अफलातून घोटाळा?

अमृत आहार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर आता अंगणवाड्या मदतनीस पदासाठी लाखोंची मागणी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर सुद्धा घोटाळा सुरूच.

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यातील गावागावातील अंगणवाड्या केंद्रात शासनाचा उपक्रम असलेल्या अमृत आहार योजनेत मोठा घोटाळा झाला होता व त्यामुळे तत्कालीन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा अंगणवाड्या सेविका पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून मोठा सहभाग असल्याने मनसे तर्फे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करून येणाऱ्या अंगणवाड्या मदतनीस भरती मध्ये सुद्धा असाच घोटाळा करण्याची शंका उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून उपस्थित करण्यात आली होती, असे असताना सुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याच आशीर्वादाने जणू आता मदतनीस भरती मध्ये विद्यमान बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून अफलातून घोटाळा सुरू असल्याची चरचा जोमात आहे. मात्र पैसे घेतांना स्थानिक अंगणवाड्याच्या सेविका व पर्यवेक्षिका यांना समोर करून मदतनीस पदाकरिता अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून खुलेआम पैसे घेतले जातं असल्याची चर्चा आहे.

अमृत आहार योजनेत 2019-20-21-22-23 ला भद्रावती व वरोरा या दोन तालुक्यात मुळ लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसल्याचे दिसत होते मात्र त्यातील लाभार्थी कोण याबाबत या विभागाने फार गोपनीयता ठेऊन शिस्तबद्ध अमृत आहार योजनेत भ्रष्टाचार केला आता तर त्याच अंगणवाड्या सेविका व पर्यवेक्षिका यांच्या मदतीनं मदतनीस पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांकडून बाल विकास प्रकल्प अधिकारी पैसे घेत असल्याच्या चर्चा असल्याने आता लाखो रुपयांची उलाढाल होण्याची दाट शक्यता आहे.

मनसे करणार पर्दाफाश ?

वरोरा येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयात उशिरा अर्ज घेऊन सुद्धा लवकर पात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली पण भद्रावती येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी लवकर फॉर्म भरण्यास सुरुवात करून सुद्धा पात्र उमेदवारांची यादी लावण्यास उशीर केला आहे. याबाबत अगोदरच यांची अंतर्गत खिचडी पकलेली होती व तसा प्रोग्राम सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक ठरवला व मधात असणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्नं केला पण मांजर दूध पिताना कुणाला ठाऊक नसल्याचं जसं मांजरांना वाटतं तसं कदाचित या विभागातील अधिकाऱ्यांना वाटतं असावं आणि म्हणून त्यांच्या या संभावित घोटाळ्याची कल्पना वरिष्ठांना देऊन सुद्धा जर मदतनीस पदासाठी पैसे घेऊन भरती होत असेल तर मनसे कार्यकर्ते आता यांचा छडा लावण्यासाठी मदतनीस पदासाठी पैसे घेणाऱ्या त्या अंगणवाड्या सेविका व पर्यवेक्षिका यांच्या मागे ससेमिरा लावण्यात आला आहे.

कशी खेळतात चाल?

बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या नेत्रुत्वात होणाऱ्या अंगणवाड्या मदतनीस भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज दिले त्यापैकी जो कुणी उमेदवार पात्र आहे त्यांच्याकडेच अंगणवाडी सेविका किंव्हा पर्यवेक्षिका ह्या जातात व तुझी नौकरी पक्की म्हणून त्यांच्याकडून पैशाची डिमांड करतात व त्यांच्या कुवतीनुसार व त्यांच्या स्पर्धेत असणाऱ्या उमेदवार यांचा विचार करून मग किती अमाउंट घ्यायची हे ठरवले जाते. प्लान पक्का असतो व उमेदवार सुद्धा पात्रच असतो पण पात्र उमेदवाराला तुझ्यापेक्षा दुसऱ्या उमेदवाराला जास्त गुण आहे असे सांगून अमाउंट पैसे लुटल्या जातं आहे. कारण एखाद्यानं आक्षेप घेतला तरी तो उमेदवार अगोदरच पात्रच असतो व त्याला पैसे देण्याची आवश्यकता नसते पण बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाड्या सेविका यांच्या माध्यमातून एक खेळी केल्या जाते व त्या खेळीत पैसे देण्याची आवश्यकता नसतांना चक्क पात्र उमेदवारांना लुटल्या जाते. त्यामुळं कुणीही असे पैसे कुणालाही देऊ नये व कुणीही तुम्हाला पात्र नसतांना पास करणार नाही पण जे पात्र आहे व त्यांना शंभर टक्के नौकरी मिळाली असतांना त्यांच्याकडून लूट केल्या जातं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशीत जर कुणी सापडलं तर त्यांचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया वजा इशारा भद्रावती तालुक्यात मनसे पदाधिकारी यांच्याकडून प्रशासनातील अधिकारी यांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here