Home भद्रावती धक्कादायक :- स्वप्नील रासेकरची हत्त्या की करंट लागून मृत्यु ? संशयाची सुई...

धक्कादायक :- स्वप्नील रासेकरची हत्त्या की करंट लागून मृत्यु ? संशयाची सुई कुणाकडे ?

स्वप्नील च्या बहिनीने मालक विनोद ठेंगने यांच्यावर हत्त्येचा केला आरोप. दोन दिवसांनंतरही अत्यंसंस्कार करण्यास नातेवाईकांसह गावकऱ्यांचा नकार.

भद्रावती (जावेद शेख) :-

तालुक्यातील बेलगांव येथील स्वप्नील रासेकर वय 26 वर्ष यांची त्यांचे मालक विनोद ठेंगने यांच्या शेतात शनिवार ला रात्री च्या वेळी हत्त्या झाली की त्याचा करंट लागून मृत्यु झाला याबद्दल संशय कायम असून मृतक च्या बहिनीने दिलेल्या प्रतिक्रियेत माझ्या भावाची हत्त्या झाल्याचा धक्कादायक खुलासा केल्याने अख्खा गाव हादरला आहे. दरम्यान माझ्या भावाला घरून बोलावून नेले व शेतात त्याचा मृत्यु झाला पण त्याला घरी आणताना व माझ्या भावाचे घर हे त्याचे मालक विनोद ठेंगने यांच्या घराजवळ असतांना माझ्या आईला सूचना का दिली नाही व परस्पर रुग्णालयात कां नेण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित केल्याने स्वप्नील ची हत्त्याच झाली असावी असा संशय व्यक्त होतं आहे. महत्वाची बाब म्हणजे या गंभीर प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

स्वप्नील रासेकर हा मागील चार वर्षांपासून विनोद ठेंगने यांच्या शेतात काम करायचा व अगदी प्रामाणिकपणे त्याचे व्यवहार होते. शनिवारला रात्री च्या वेळी अचानकपणे विनोद ठेंगने यांनी त्याला बोलावून शेतात नेले व त्यानंतर तो मरण पावला असल्याची वार्ता गावात पसरली विशेष म्हणजे स्वप्नील ला घरी दुचाकीने घरी आणताना त्याच्या परिवाराला कुठलीही सूचना दिली नाही त्यामुळं त्याची हत्त्या केली असावी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रकरण रफादफा करण्याचा मनसुबा विनोद ठेंगने यांचा असावा अशी शंका निर्माण झाली आहे. या संदर्भात काल भद्रावती च्या सरकारी रुग्णालयात आई व बहीण यांच्यासह गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करून जोपर्यंत आरोपी विरोधात गुन्हा दाखल होतं नाही व मृतकाच्या नातेवाईक यांना नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा हट्ट केल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.

साहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी दिली मृतक स्वप्नील च्या घरी भेट.

भद्रावती पोलिसांनी आम्हांला न्याय दिला नाही, आम्हांला अंधारात ठेऊन स्वप्नील चे परस्पर पोस्टमॉर्टेम करण्यात आले त्यामुळं जोपर्यंत आरोपी विनोद ठेंगने यांच्यावर गुन्हा दाखल होतं नाही व स्वप्नील च्या नातेवाईक यांना नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी चे अंत्यसंस्कार करणार नाही असा इशारा काल गावकऱ्यांनी दिल्यानंतर या क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी व साहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी मृतक स्वप्नील च्या घरी भेट देऊन आई व बहीणीचे सांत्वन केले व न्याय नक्कीच मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा अशी ग्वाही दिली. परंतु जोपर्यंत आरोपी विरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत बॉडी चे अत्यंसंस्कार करणार नसल्याच्या निर्णयावर गांवकरी ठाम असल्याचे बोलल्या जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here