Home गडचिरोली नागपूर हवामान खात्यांचा इशारा,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट

नागपूर हवामान खात्यांचा इशारा,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर पाऊस  :-   राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी  लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, नागपूर हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज ददिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

           या भागात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि  गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here