Home चंद्रपूर डॉ पंजाबराव देशमुख विद्यालयातील गुरुजीचे होत आहे सर्वत्र कौतुक

डॉ पंजाबराव देशमुख विद्यालयातील गुरुजीचे होत आहे सर्वत्र कौतुक

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  शाळा म्हटलं की काही ना काही नवीन शिकायला मिळणारच आणि या शाळेतील शिकवणारे गुरुजी हे न विसरणारे आपले गुरु असतात आणि डॉ पंजाबराव देशमुख विद्यालय मधील असेच एक गुरुजी म्हणजे राडे गुरुजी हे गुरुजी या शाळेत भूगोल व मराठी शिकवतात पण या गुरुजीची एक वेगळी ओळख आहे. कारण हे गुरुजी या दोन विषया व्यतिरिक्त मुलांना काही तरी नवीन शिक्षण देत असतात उधारणात झाडे लावणे आपला परिसर आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवणे आपल्या वाड्यातील परिसर आणि येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील रंगीबिरंगी फुलाचे व सुंदर असे दिसणारे झाडे लावने इतकेच नाही तर त्याचे संगोपन कसे करायचे आणि दुसऱ्यांना पण कसे सांगायचे हे सुद्धा या मुलांना येथील गुरुजी शिकवतात आणि या शाळेतील परिसरातील सुद्धा हा उपक्रम राबवत असतात आणि आता सध्या पाण्याचे दिवस चालू आहे त्यामुळे गुरुजी मागे कसे राहणार म्हणून या गुरुजींनी डॉ पंजाबराव देशमुख मधील सर्व विद्यार्थ्यांना वरतून येणारा पाऊस आपण जमिनीवर पडताना तर पाहतो परंतु हा पाऊस किती आणि कसा मोजल्या जाईल याची माहिती मुलांना दिली या वेळी पाणी मोजण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्या साहित्यापासून यंत्रने कसे बनवायचे आणि या यंत्रणात पाणी कसे जमा करायचे नंतर ते कसे मोजायचे हे सर्व माहिती यावेळी येथील मुलांन गुरुजीने दिली. आणि यातील उदाहरण काल दिनांक १८,०७,२०२३,ला झालेला पाऊस २४,तासांत किती पडला व या पाण्याला कस मोजायचा हे या गुरुजीनि येथील मुलांना समजून सांगितले काल पडलेला पाऊस २२८, मिली लिटर इतका झालेला आहे. असे या शाळेच्या गुरुजींनी सांगितलेले आहे आणि यावेळी येथील राडे गुरुजींनी सांगितले की हे यंत्र शंभर टक्के बरोबर माहिती देत असतात. म्हणून या गुरुजीचे नुसते शाळेतच नाही तर सर्वत्र कौतुक केले जात असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here