Home भद्रावती धक्कादायक :- भद्रावती तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस पात्र उमेदवारांची यादी गायब ?

धक्कादायक :- भद्रावती तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस पात्र उमेदवारांची यादी गायब ?

जाहिरात मध्ये दर्शवल्या प्रमाणे 18 जुलै ला प्रकाशित होणारी यादी रोखल्याने उमेदवार संभ्रमात?

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यातील अंगणवाड्या मदतनीस भरती मध्ये मोठा घोटाळा करण्याची शंका मनसे तर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती, मात्र असे असताना सुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याच आशीर्वादाने जणू आता मदतनीस भरती मध्ये विद्यमान बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून घोटाळा सुरू आहे का ? असा प्रश्न विचारला जातं आहे. कारण स्थानिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रकाशित केलेल्या जाहिरातीत 18 जुलै ला अंगणवाडी मदतनीस पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्याची बाब निर्देशित केली असतांना ती यादी 18 जुलै ला का प्रकाशित करण्यात आली नाही ? का पात्र उमेदवारांकडून पैसे पोहचले नाही ? की मध्येच घोळ झाला ? हे कळायला मार्ग नसून जणू पात्र उमेदवारांची यादीच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमानुसार जर ठरलेल्या कालावधीत व तारखेस कार्यालयीन कामकाज झाले नसेल तर त्याबाबत जाहीर पत्रकं काढून व प्रसारमाध्यमांना प्रेस नोटदेऊन खुलासा करायला हवा पण तो सुद्धा करण्यात आलेला नसल्याचे कळते, दरम्यान याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करून ज्या पात्र उमेदवारांकडून पैशाची मागणी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून व काही एजंट मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केली असल्याची चर्चा आहे त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होतं आहे.

भद्रावती तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीत होणारी अंगणवाड्या मदतनीस भरती करिता या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून एक मोठी शक्कल लढवल्या गेली असुन जर कुणी या प्रकरणाची तक्रार सुद्धा केली तरी या विभागात सर्व काही व्यवस्थित आणि कायद्यानुसार भरती प्रक्रिया केली असल्याचे दस्तावेजावरून लक्षात येईल. पण इथेच मोठा घोळ असुन ज्या उमेदवारांनी अर्ज दिले त्यापैकी जो कुणी उमेदवार पात्र आहे त्यांच्याकडेच अंगणवाडी सेविका किंव्हा पर्यवेक्षिका ह्या जातात व तुझी शिफारस करते पण तुला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील व यांची वाच्यता तू कुठेही करू नकोस असे सांगतात व पैसे घेऊन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे ही रक्कम सोपवतात त्यात सर्वांचा सहभाग असतो अशी चर्चा जोरात असुन काही ठिकाणी याबाबत पुष्टी सुद्धा व्हायला लागली आहे.

पात्र उमेदवारांना आवाहन.

स्थानिक भद्रावती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी ज्या पद्धतीने अंगणवाडी मदतनीस भरती मध्ये एक आपली स्वतंत्र यंत्रणा वापरून व आपल्यावर कुठलाही आक्षेप येऊ नये याकरिता जी शक्कल लढवली त्यात पात्र उमेदवार हेच सापडले असुन ज्याअर्थी संपूर्ण कागदपत्र यांची पडताळणी केल्यानंतरच पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली तर मग त्यांनी आपल्यां नियुक्ती करिता पैसे का द्यावे? त्या पात्र उमेदवारांनी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्या म्हणण्यानुसार पैसे देऊ नये व पैसे दिले असल्यास ते पैसे परत घ्यावे कारण तुम्हची नियुक्ती ही तुम्हच्या कागदपत्रांनुसारच करण्यात आली आहे आणि नियमानुसार तुम्हाला पात्र ठरविण्यात आले आहे त्यामुळे तुम्हच्याकडून घेतले गेलेले पैसे हे बेकायदेशीर आहे ते परत मागा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येतं आहे.

Previous articleडॉ पंजाबराव देशमुख विद्यालयातील गुरुजीचे होत आहे सर्वत्र कौतुक
Next articleपावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार जोरगेवार विधानभवनातून थेट पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here