Home चंद्रपूर अष्टभुजा वॉर्ड,रमाबाई नगर येथील समस्या दूर करण्यासाठी

अष्टभुजा वॉर्ड,रमाबाई नगर येथील समस्या दूर करण्यासाठी

आप च्या पुढाकाराने
-मनपा आयुक्त साहेबांना दिले निवेदन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-गेल्या चार पाच दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने संपूर्ण चंद्रपूर शहरात पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अष्टभुजा वॉर्ड रमाबाई नगर जवळ असलेल्या महानगरपालिका अंतर्गत डम्पिंग यार्डची भिंत पावसामुळे पडल्याने डम्पिंग यार्डमधील कचरा व खराब पाणी वस्तीत काहींच्या घरात घुसल्याची माहिती व इतर समस्या रमाबाई नगर वाशियानी आमआदमी पक्षाच्या नगर महिला अध्यक्षा ऍड,सुनिता पाटील यांना दिली, आणि तत्परतेने समस्या लक्षात घेत आप ने पुढाकार घेऊन,महानगरपालिका येथे मा. आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आले,
तात्काळ समस्याचे निवारण दूर करण्यासाठी प्रयत्न करणार व जेसीबी लावून पाणी बाहेर काढले जाणार व नवीन भिंत बांधण्यात येईल असे संबंधित अधिकारी यांनी सांगितले आहे.
यावेळी आप च्या नगर महिला अध्यक्षा ऍड, सुनीता पाटील, जासमीन शेख, जिल्हा संघटन मंत्री, भिवराज सोनी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नासिरभाई तसेच सुनंदा मेश्राम, कविता चचाने,शीला निषाद,रंजु गुप्ता, सुषमा बूरबांधे, सविता सपकाळ, शैला उके,इत्यादी रमाबाई नगर येथील महिला उपस्थित होत्या,

Previous articleसिटीपीएस प्रकल्पग्रस्त नोकरभरती प्रकरणात 72 अपात्र तर 32 व्यक्तीवर गुन्हे दाखल
Next articleपाटाळा व माजरी परिसरात वेकोलिच्या जागेवरील सागवानची चोरी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here