Home भद्रावती पाटाळा व माजरी परिसरात वेकोलिच्या जागेवरील सागवानची चोरी ?

पाटाळा व माजरी परिसरात वेकोलिच्या जागेवरील सागवानची चोरी ?

सागवानची झाडे विकत घेणाऱ्या ठेकदार यांच्यावर वनविभाग व वेकोलि प्रशासन मेहरबान का ?

माजरी प्रतिनिधी :-

भद्रावती तालुक्यातील पाटाळा व माजरी परिसरात असलेल्या
एकरे आणि मैस्के यांच्या खाजगी शेतात सागवान झाडाच्या कटाई नंतर वेकोलि परिसरातील मोठं मोठ्या सागवान झाडांची बेकायदेशीरपणे कटाई करून जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचा सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व चंद्रपूर च्या व्यापाऱ्यांना विकला असल्याची माहिती असुन या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संबंधित ठेकेदार यांच्यासह स्थानिक वनविभाग प्रशासनातील अधिकारी व वेकोलि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

जवळपास तीन महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील एका ठेकेदाराने पाटाळा व माजरी परिसरात असलेल्या एकरे आणि मैस्के यांच्या खाजगी शेतात असलेल्या सागवान झाडांची खरेदी केली होती. दरम्यान सागवान झाडांच्या तोडणी करिता वन विभागाची परवानगी मिळवावी लागत असते त्यासाठी वनविभाग स्वतःचे कर्मचारी पाठवून मौका चौकशी करतात मात्र त्या शेतातील झाडांची तोडणी झाल्यानंतर ठेकेदाराने वेकोलिच्या हद्दीतील मोठं मोठी सागवान झाडांची कत्तल करून जणू सागवान झाडांची चोरी केली आहे. याबाबत वन विभागाला व वेकोलि अधिकारी यांना कल्पना नसावी यांचे आश्चर्य वाटत असुन या बेकायदेशीर झाडे कटाईची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

Previous articleअष्टभुजा वॉर्ड,रमाबाई नगर येथील समस्या दूर करण्यासाठी
Next articleलक्षवेधी :- मणिपूर मधे हिंसाचार सुरू आहे त्यामागचं कारणं काय ? भाजपची सत्ता असतांना का उठलं वादळ ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here