Home चंद्रपूर वडगाव प्रभागात कर्करोग तपासणी गाडी 115 नागरिकांनी घेतला लाभ माजी नगराध्यक्षा, नगरसेविका...

वडगाव प्रभागात कर्करोग तपासणी गाडी 115 नागरिकांनी घेतला लाभ माजी नगराध्यक्षा, नगरसेविका सुनीता लोढिया यांच्या पुढाकारांतून

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- दि. 21.07, वडगाव प्रभाग मध्ये कर्क रोग तपासणी गाडी माझी पालकमंत्री मा. विजय वडेटीवार यांच्या सोजन्याने उपलब्ध झाली या गाडीतील दवाखान्यातुन वडगाँव प्रभागातील नागरिकाना कर्करोग तपासणी साठी निशुल्क दवाखाना होता या दवाखाना आहे. त्या दवाखान्यात संपूर्ण डिजिटल आणि नवीन पद्धतीचे मशनरी व रक्त तपासणीचे सर्व सोयी उपलब्ध होत्या आताच्या काळात युवा पिढी व बुजुर्ग नागरिकामध्ये कर्करोग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण डॉक्टरांच्या माहितीनुसार कर्करोग वाढण्याच्या आधी कमी क्षमतेमध्ये या कर्करोगाचा उपचार केल्यास तो कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो या उद्देशाने या गाडीतील दवाखान्याला नवण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच येतील माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेविका सौ सुनीता लोढीया यांच्या पुढाकारातून आज वडगाव प्रभागातील 115 नागरीकांनी कर्करोग तपासणीचा लाभ घेतलेला आहे. या शिबिराला महत्त्वपूर्ण पार पाडण्यास नागपूर वरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्क रोग निदान दवाखान्यातील 10 लोकांची टीम सोबतस डॉ. रोहन आईंचवार यांच्या टीमने eHi दवाखान्यातील रक्त तपासणी व महानगर पालीकेचे आरोग्य विभागाने B, P,  व शुगर, तपासणीसाठी मदत केली. तसेच वडगावातील नागरीकांनी एवढी मोठी गाडी फिरता दवाखाना मेमोग्राफी, कर्करोग निदाना करीता आपल्या दारात उभी होणारं असल्यामुळे दवाखाना वडगावला येतांच सगळ्या डॉक्टर व टीमचे स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभ माजी जिल्हाअध्यक्ष मा. विनायक बांगडे, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका, सौ, सुनिता लोढिया , कृषी उत्पन्नबाजार संचालक, अजय बलकी, यांच्या हस्ते करण्यात आले. आणि यावेळी शिबिराला यशस्वी करण्यास मदत व सहकार्य भाषिक येरगुडे, रौनक लोढिया, नकुल मुसळे, सागर अधम, लवलेश निषाध, ग्रामपंचायत सदस्य, विक्की जोशी, नंदुभाऊ पाऊनकर, निलेश पाऊनकर आदि उपस्थित राहून शेवट पर्यंत सहकार्य करून मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here