Home राष्ट्रीय खळबळजनक :- येणाऱ्या 2024 च्या लोकसभेत नितीन गडकरी पंतप्रधान होणार ?

खळबळजनक :- येणाऱ्या 2024 च्या लोकसभेत नितीन गडकरी पंतप्रधान होणार ?

देशातील कर्नाटकात हरल्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाची वाट.

राजकीय कट्टा :-

देशातील कर्नाटक राज्यात काँग्रेस कडून हरल्यानंतर आता मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील राजकीय चित्र बघितले तर इथे सुद्धा भाजप ला सत्ता मिळेल असे वाटतं नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढ्या वेळा आणि एवढ्या ठिकाणी आश्वासनांची खैरात वाटली पण ती आश्वासने जुमले निघाले आणि देशात महागाई बेरोजगारी यामुळं जनता अगोदरच त्रस्त असल्याने जनतेत भाजप प्रती असलेली आपुलकी आपोआप संपल्यात जमा आहे, त्यातच आता मणिपूरमध्ये सतत दोन महिन्यांपासून जातीय हिंसाचार विकोपाला गेल्यानंतर सुद्धा पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यावर होते व आता तर तिथे दोन तरुण महिलांची नग्न धिंड काढली त्यामुळं जगात भारताची मोठी बदनामी होऊन केंद्र सरकार विरोधात मोर्चे निघायला लागले आहे. अर्थात मणिपूर प्रकरणात भाजप ला सर्वत्र अक्षरशः लोक शिव्यांची लाखोळी वाहत आहे. त्यामुळं जर पंतप्रधान म्हणून मोदीला समोर केले तर भाजप 2024 ची लोकसभा निवडणूक हरणार हे पक्कं गणित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते व तसा सर्व्हे सुद्धा आहे. यासाठी भाजप दोन गटात विभागली जाण्याची शक्यता असली तरी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे नितीन गडकरी यानाच समोर करण्याची शक्यता असल्याने येणाऱ्या 2024 मध्ये नितीन गडकरी पंतप्रधान बनले तर नवल वाटू नये.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.त्यात आता मध्यप्रदेश राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांसह तेलंगणा व मिझोराम येथे सुद्धा भाजपला सपशेल पराभवाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. इथे काँग्रेसच्या राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचा हा पराभव झाल्यास मोदीसाठी एकूण धोक्याचा इशारा आहे असेच म्हणावे लागेल.

कर्नाटकात काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही तर, त्यांनी काँग्रेसला देशाच्या राजकारणातून संपवता येऊ शकत नाही हेच सिद्ध केले आहे. त्यामुळे 2024 मध्ये काँग्रेस जरी जिंकली नाही तरी भाजपालाही सहजासहजी विजय मिळणार नाही हे या निकालावरून तरी स्पष्ट होत आहे. भाजपसमोर 2024 च्या लोकसभा निवडणुकामधे काँग्रेसचे तगडे आव्हान असेल. अशा वेळी 2014 व 2019 मध्ये मोदीं लाटेत ज्याप्रमाणे भाजपला बहुमत मिळाले त्या पद्धतीने बहुमत मिळणे कठीण दिसत आहे. त्याचबरोबर, 1996 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्याप्रमाणे 13 छोट्यामोठ्या मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात युतीचे सरकार स्थापन केले. परंतु, जर 2024 ला लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तशी परिस्थिती निर्माण झाली तर मित्रपक्ष मोदींना पंतप्रधान म्हणून कितपत पसंती देतील यावर मात्र शंका आहे. कारण; 2014 पासूनची परिस्थिती पाहिल्यास पंतप्रधान मोदी आणि भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आताचे ग्रुहमंत्रीअमित शहा या जोडगोळीचे तसे पहायला गेल्यास मित्रपक्षांसोबत खास असे काही जुळलेले नाही. म्हणूनच 2024 ला भाजपला मित्रपक्षाव्यतीरिक्त सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास नवा चेहरा आणि मोदींना सशक्त पर्याय शोधावा लागेल आणि त्यात नितीन गडकरी एवढा प्रगल्भ नेता भाजप जवळ दुसरा नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकामध्ये जर समजा भाजप 220-225 जागांपर्यंत अडकल्यानंतर सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष, सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लाडका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासाच्या मार्गावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे असे लोकांना वाटणार चेहरा म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येऊ शकते. त्यामुळं “राजतिलक की करो तयारी आ रहे है नितीन गडकरी.” असा जयघोष करून 2024 मध्ये नितीन गडकरी पंतप्रधान बनले तर आश्चर्य वाटायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here