Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना धोका!

चंद्रपूर जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना धोका!

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर. :-. संततधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात नदीनाले तंडूब भरले असतानाच आज शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा व पैनगंगानदीला पाणी वाढले आहे. त्यामुळे कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील नदीकाठावरील गावांना धोक्याची घंटा आहे. गडचांदूर चंद्रपूर मार्गावरील वर्धा नदीच्या धानोरा पुलावर सातत्याने पाणी वाढत असल्याने 21 जुलै पासून हा मार्ग अद्याप बंद आहे. त्यामुळे यवतमाळ मधील अतिवृष्टीने पैनगंगा व वर्धा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मार्ग पुन्हा बंदच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापासून संततधार मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नदी नाले तलाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत. पाच दिवसांपूर्वी मंगळवारी (18 जुलै) चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वर्धा नदीला पूर येऊन गोंडपिपरी, चंद्रपूर, कोरपना गडचांदूर तालुक्यातील नदी काठावरील गावांना याचा फटका बसला. पाऊस कमी अधीक प्रमाणात सुरूच असल्याने शेतीही प्रभावीत झाली आहे. काल हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु आज शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा फारसा जोर पहायला मिळाला नाही. कुठे रिपरिप तर कुळे चांगल्या सरी कोसळल्या. परंतु चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातला पावसाने झोडपून काढीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना धोक्याची घंटा आहे. यवतमाळ जिल्ह पैनगंगा नदी वाहत आली आहे.चंद्रपूरात येऊन घुग्घूस जवळ वढा येथे वर्धा व पैनगंगा नदीचा संगम होते. पुढे चंद्रपूरातून गोंडपिपरी मार्ग आंध व महाराष्ट्र सितेपर्यंत वर्धा नदी वात जाते. यवतमाळातील आज शनिवारच्या अतिवृष्टीमुळे पैनगंगेला पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे वर्धानदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हयात झालेल्या संततधार पावसाने गडचांदूर चंद्रपूर मार्गावरील धानोरा पुलावर 21 जुलै पासून पुराचे पाणी आहे. रात्री आठपासून हा मार्गा पूर्णतः बंद आहे. आता पैनगंगेमार्गे यवतमाळातून येणारे पुराचे पाणी वर्धे पडणार असल्याने वर्धाही फुगणार आहे. त्यामुळे धानोरा पुलावरील पाणी कमी न होता वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा हा मार्ग काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. वर्धा नदीवरील चंद्रपूर,बल्लापूर व गोंडपिपरी तालुक्यातील नदीकाठावरील गावांना या अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज दिवसभर यवतमाळ मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतरही सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here