Home चंद्रपूर चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ तुकुम तर्फे ” सुंदर माझे उद्यान व ओपन...

चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ तुकुम तर्फे ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ” स्पर्धा समितीची स्थापना

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दिनांक 23 जुलै २०२३ रोजी स्वामी समर्थ गार्डन हाॅल येथे चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ तुकूम चंद्रपूर च्या वतीने सभा घेण्यात आली. या सभेत महानगर पालिकेतर्फे  ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ” स्पर्धा आयोजन केलेली होती. या स्पर्धेच्या लाभ कसा घेता येईल या दृष्टीने आज 23 जुलै 2023 रोजी सभा संपन्न झाली. या सभेमध्ये सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा कशा प्रकारे राबविता येणार आणि या स्पर्धेत आपला क्रमांक कश्या प्रकारे आणता येणार. याचे नियोजन व मार्गदर्शन तुकुंम येथील माजी नगरसेवक सुभाष कासनगोटुटवार यांनी केले. या वेळी या स्पर्धेसाठी एक समिती नेमण्यात आली या समितीचे अध्यक्ष बंडूभाऊ धोटे, सचिव म.न.प.गार्डन अधिकारी, व 25 ज्येष्ठ नागरिकांची सदस्य समिती नेमण्यात आली. त्यात बबनराव तितरमारे, हरिभाऊ पाटील, देवरावजी रघाताटे, रमेश मुलकलवार, रमेश वैरागडे,चंपत वांढरे, गुलाब जोगी, विलास उत्तरवार, वसंत बल्की, अरुण दंतुलवार, श्रीरंग दवंडे, शेषराव कुरेकार, मनोहर बेले, अण्णाजी ढवस, कृष्णा मालोदे, नामदेव लांजेवार, बबनराव मत्ते,अशोक पडगिलवार, विलास चौधरी, पुरुषोत्तम राऊत, वासुदेवराव सादमवार, अशोक संगीत वार, सुधीर मुनशेट्टीवार, नानाजी ननावरे,
या समितीचे सदस्य राहतील असे चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळातर्फे कळविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here