Home चंद्रपूर क्राईम ब्रेकिंग : राजुऱ्यात पुन्हा एकदा गोळीबार.

क्राईम ब्रेकिंग : राजुऱ्यात पुन्हा एकदा गोळीबार.

भाजप नेते सचिन डोहे यांच्या पत्नीचा मृत्यू तर लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी.

राजुरा प्रतिनिधी :-

राजुरा हे क्षेत्र आता गुंडगिरीला चालना देणारे शहर ठरले असुन दोन ते तीन वर्षांपूर्वी राजू यादव यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर आता पुन्हा एकदा मोठा गोळीबार झाला असुन राजुरा शहरातीत लल्ली शेरगिल नामक व्यक्ती ला मारण्यासाठी काही मारेकरी पाठलाग करीत असताना लल्ली सचिन डोहे यांच्या सोमनाथपूर येथील घरात लपण्यास गेला असता सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा सचिन डोहे समोर आल्याने मारेकऱ्यांच्या गोळीबारात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वृत्त असुन लल्ली शेरगिल गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन लल्ली शेरगिल यांच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. राजुरा येथील सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मार्गावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून जागीच मृत्यूमुखी पडल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.

सदर घटना लक्षात येताच घरातील व आजूबाजूच्या मंडळींनी दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे ह्यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले का माजी नगरसेवक राजेंद्र डोहे ह्यांचेसह बाहेर गेले होते.घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असुन आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Previous articleचैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ तुकुम तर्फे ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ” स्पर्धा समितीची स्थापना
Next articleजन आक्रोश मोर्चा  आज दि,24/07/24 रोज सोमवार ला ठीक 12:00वाजता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here