Home चंद्रपूर जन आक्रोश मोर्चा  आज दि,24/07/24 रोज सोमवार ला ठीक 12:00वाजता

जन आक्रोश मोर्चा  आज दि,24/07/24 रोज सोमवार ला ठीक 12:00वाजता

गांधी चौक ते जिल्हा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर

आयोजक – सर्व चंद्रपूरकर

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-चंद्रपूर वासीय सर्व जनतेला कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे की मणीपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून त्यांचेवर अनन्वित लैंगिक अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याची अत्यंत संतापजनक व हृदय हेलावून टाकणारी घटना घडलेली असून तेथिल क्रूर सत्ताधारी समुदायाने मागील तीन महिन्यापासून असहाय जनतेवर अत्यंत क्रूर हल्ले करुन निष्पाप बालकां महिलांसह शेकडो लोकांची अमानुष हत्या केली असून अन्याय क्रूर अत्याचाराचे सत्र आजतागायत अव्याहत सुरूच आहे. आणी आणीबाणीच्या वेळी संविधानिक जबाबदारी पायदळी तुडवत राज्य व केंद्रीय सरकार अत्याचार सत्र उघड्या डोळ्यांनी बघत बसली आहे. ह्या अमानुष अत्याचार मालिकेचा व त्याच्या पाठीराख्यांचा निषेध करण्यासाठी चन्द्रपूरच्या जनतेच्या उत्स्फुर्त स्वयंप्रेरीत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मानवीय संवेदना ज्यांच्या हृदयात ज्वलंत आहेत अशा तमाम चंद्रपूर वासीय जनतेनी ह्या जन आक्रोश मोर्चात पावसाची पर्वा न करता सामिल होउन आपल्यातील संवेदना व मानवी मुल्यांची प्रचिती द्यावी. हिच कळकळीची विनंती.
हा जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 24 जुलै 2023 ला ठिक 12 वाजता महानगर पालिका चौकातून सुरु होउन जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येइल. तरी आपण सर्व संवेदनशील जनतेनी आपली हातातील कामे माणुसकी खातर एक दिवस बाजूला सारून प्रचंड संख्येने या पक्ष निरपेक्ष संघटन निरपेक्ष नागरी आक्रोश मोर्चात आपली जबाबदारी समजून सहभागी होउन आपला माणुसकीचा बुलंद आवाज देशभर पोहचवावा हीच कळकळीची विनंती.

Previous articleक्राईम ब्रेकिंग : राजुऱ्यात पुन्हा एकदा गोळीबार.
Next articleसनसनिखेज :- अंगणवाडी मदतनीस भरती घोटाळ्यां प्रकरणी पुरावे लवकरच येणार समोर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here