Home भद्रावती सनसनिखेज :- अंगणवाडी मदतनीस भरती घोटाळ्यां प्रकरणी पुरावे लवकरच येणार समोर ?

सनसनिखेज :- अंगणवाडी मदतनीस भरती घोटाळ्यां प्रकरणी पुरावे लवकरच येणार समोर ?

भद्रावती तालुक्यातील अंगणवाड्या मदतनीस भरती मध्ये मोठा घोटाळा करण्याची शंका अगोदरच मनसे तर्फे करण्यात आली

भद्रावती :-

बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका द्वारे अंगणवाडी मदतनीस भरती करिता पात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन मोठा घोटाळा करण्याची शंका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती, मात्र असे असताना सुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याच आशीर्वादाने जणू आता मदतनीस भरती मध्ये विद्यमान बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून घोटाळा करण्यात आल्याची ओरड होतं असून या संदर्भात ज्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली ते लिस्ट जाहीर झाल्यानंतर बोलायला तयार असल्याने बाल विकास प्रकल्प अधिकारी व संबंधीत कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. दरम्यान या प्रकरणी अनेक गुंतागुंत असून कोणी कुणाला फोन केला व त्यात काय दडलय ? याचा गौप्यस्फोट सुद्धा समोर येण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रकाशित केलेल्या जाहिरातीत 18 जुलै ला अंगणवाडी मदतनीस पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्याची बाब निर्देशित केली असतांना ती यादी 18 जुलै ला प्रकाशित करण्यात आली नाही यांचे कारणं तांत्रिक अडचण असे नमूद केले असले तरी पात्र उमेदवारांकडून ज्या पैशाची डिमांड करण्यात आली तो पैसा योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडे पोहचला नाही त्यामुळं तारीख लांबवर टाकण्यात आली दरम्यान आता ही यादी आज प्रकाशित करण्यात येणार असून यामध्ये पात्र अंगणवाडी मदतनीस उमेदवार यांच्याकडूनच पैशाची मागणी करण्यात आल्याची माहिती असून इतर उमेदवार यांच्यांत पैसे घेऊन उमेदवार निवडला गेला असल्याच्या तक्रारी होणार आहे तर ही निवड प्रक्रिया वादात सापडली असल्याने भद्रावती तालुक्यात अंगणवाडी मदतनीस भरती नव्याने घेण्याची मागणी सुद्धा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कसा केला घोळ ?

बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी मदतनीस भरती मधे घोळ करण्याची नामी संधी ओळखून आपल्या विरोधातील वातावरण अगोदर निवळले आणि मग पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना सजग केले की आम्ही तुम्हांला पात्र उमेदवार सांगू त्यांच्या कडे जायचं व त्यांना सांगायचं की तुम्हांला आम्ही सिलेक्ट करायला लावू पण तुम्ही एवढी रक्कम द्यायची आहे. दरम्यान यात ही यंत्रणा 70 टक्के यशस्वी झाल्याची माहिती असून काहींनी मात्र पैसे दिले नसल्याने दिनांक 18 तारखेला जाहीर होणारी यादी ही 24 तारखेला जाहीर होण्याची माहिती देण्यात आली अशी चर्चा आहे. पण ज्याअर्थी अंगणवाडी मदतनीस उमेदवार त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार पात्र आहे तर मग त्यांनी निवडी करिता पैसे कां द्यावे ? हा घोळ आता समोर येणार असल्याने यात कुणाचा गेम होतोय हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here