महिलांवरील हा एक प्रकारचा अत्याचारचं असल्याच्या जनभावना प्रशासन कधी समजेल ?
लक्षवेधक :-
वरोरा शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे व ट्रामा केअर सेंटर सुद्धा आहे, पण उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी व्यवस्थित नाही. सिटी स्कैन मशीन नाही व एक्सपर्ट डॉक्टर नाही, ट्रामा केअर मध्ये व्हेंटिलेटर मशीन आहे पण ऑपरेटरचं नाही असे असतांना ट्रामा केअर च्या समोर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेवर पन्नास खाटांचे रुग्णालय उभे करायचे आहे. कुणी म्हणतो इथे चिरघर बनवायचे आहे व कुणी म्हणतो रुग्णालयासाठी 46 कोटी मंजूर झाले तर कुणी म्हणतो 70 कोटी रुपये मंजूर झाले, शेवटी बनवाबनवी करतांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनीच खरं सांगितलं की असा कुठलाही निधी आला नाही तर मग ट्रामा केअर समोरील रुग्णालयाच्या जागेवर अतिक्रमण करून जिजाऊ ब्युटीक च्या माध्यमातून रोजगार उभारणाऱ्या महिलांच्या दुकानावर प्रशासनाने कुणाच्या सांगण्यावरून हातोडा चालवला ? विशेष म्हणजे केवळ मोजक्या दुकानावर हातोडा चालवून एका ठेकेदाराच्या दुकानाला का वाचविण्यात आले ? यांचे कारण आता समोर आले असुन राजकीय वैर डोळ्यासमोर ठेऊन व प्रशासनाला हाताशी धरून लोकप्रतिनिधी यांनी हा निंदनीय प्रकार केल्याचे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख योगिता लांडगे यांनी जाहीर केले आहे. पण काँग्रेस च्या एका कंत्राटदाराचे त्याचं लाईनमधील दुकान सोडून केवळ महिलांचा रोजगार हिरावून त्यांना कुठला आनंद झाला असेल व त्यावेळी प्रशासनाच्या संवेदना मेल्या होत्या का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वरोरा शहरात अतिक्रमण हा नित्याचाचं भाग असला तरी ज्या अतिक्रमणापासून जनजीवन विस्कळीत होते किंवा रहदारीच्या मार्गावर अडथळा निर्माण होते त्या अतिक्रमणावर प्रशासनाने हातोडा चालवला तर कुणाला काही शंका घेण्याचे कारण नाही पण जे प्रशासन शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे व नागरिकांना चांगले रस्ते आरोग्य व त्यांच्या दैनंदिन गरजा यासाठी म्हणून काम करण्याचे कर्तव्य असतांना ते प्रशासन स्थानिक काही राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी यांच्या तालावर नाचून सर्वसामान्य जनतेच्या हक्क अधिकारावर गदा आणत असेल तर मग या प्रशासनातील अधिकारी हे लोकशाहीची हत्त्या करताहेत तर मग त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का ? हा प्रश्न शहरातील काही बुद्धिजीवी लोक विचारात आहे.
ट्रामा केअर समोरील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेवर जिजाऊ ब्युटीक नावाचं महिलांचं रोजगाराचं अधिष्ठान आहे, जिथे कोराना काळात जवळपास पन्नास महिलांना रोजगार देऊन त्यांना आर्थिक मदत मिळवता आली, त्या ब्युटीक मध्ये आजही जवळपास 42 ते 45 महिला युवती कपडे शिवण्याचे धडे घेत आहे व त्यातून शिकून आपला उदरनिर्वाह करत आहे. इतकेच काय तर या जिजाऊ ब्युटीक ला आनंदवन कॉलेज च्या विद्यार्थिनीचे कपडे शिवण्याचे कंत्राट मिळाले व मार्केट रेट पेक्षा पन्नास टक्के कमी दरात हे कपडे शिवून मिळणार आहे, तिथे प्रशासनाने अतिक्रमण च्या नावाखाली हातोडा चालवला व महिलांचा रोजगार हिरावून घेतला त्यावेळी हे रोजगाराचं अधिष्ठान पाडताना प्रशासनाच्या संवेदना मेल्या होत्या का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हे अतिक्रमण पाडताना स्थानिक पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची अरेरावी ही अतिशय वेदना देणारी ठरली ज्यांचा उपस्थित जिजाऊ ब्युटीक च्या संचालक महिलांनी मोठा संताप व्यक्त केला. कारण एकीकडे त्या महिलांचे अधिष्ठान तोडल्या जातं होते तर दुसरीकडे पोलीस अधिकारी विशेषतः सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे हे महिलांना धमकावत होते.