Home क्राईम स्टोरी भाजप नेते सचिन डोहे यांच्या पत्नी व लल्ली शेरगिल चे मारेकरांना 24...

भाजप नेते सचिन डोहे यांच्या पत्नी व लल्ली शेरगिल चे मारेकरांना 24 तासाच्या आत अटक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

राजुरा  :-  राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे ह्यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले का माजी नगरसेवक राजेंद्र डोहे ह्यांचेसह बाहेर गेले होते.पूर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना राजुरा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी लबज्योत सिंह दहेल व दुसरा आरोपी अल्पवयीन असून असून दोन्ही आरोपींवर भादंवी च्या कलम 302, 307, 34 व अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

Previous articleगंभीर :- जिजाऊ ब्युटीक चे अतिक्रमण पाडताना प्रशासनाच्या संवेदना मेल्या का ?
Next articleआता पोलीसही कंत्राटी? मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे भरण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here