Home मुंबई आता पोलीसही कंत्राटी? मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे भरण्याचा निर्णय

आता पोलीसही कंत्राटी? मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे भरण्याचा निर्णय

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मुंबई  :-   मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यासाठी ही भरती करणार असून अश्या प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरती केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहायक निरीक्षक यांची ४०.६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. पोलीस दलात मनुष्यबळाची त्रिव टंचाई आहे. राजकीय नेत्याच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. गणेशउत्सव, नवरात्रउत्सव, रमजान, दिवाळी, अश्या सणासुदीच्या  काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसाची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याच्या पोलिस आयुक्ताच्या आग्रह होता असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here