Home चंद्रपूर चंद्रपूर शहरातील गड्ड्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव

चंद्रपूर शहरातील गड्ड्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर – देशाच्या राजकारणात आम आदमी पक्षाने स्वतःची उपस्थिती सिद्ध केली आहे, हळूहळू आप पक्ष विविध राज्यात सक्रिय होताना दिसत आहे, लहान वृक्ष आता वटवृक्ष होत असल्याचे बघून प्रस्थापित पक्षांची घाबरगुंडी उडाली आहे.

चंद्रपुरात सुद्धा आप पक्षाने विविध मुद्द्याला उचलत नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम सुरू केले आहे, नुकतंच आप पक्षाने रामसेतू पूल 6 इंच कोसळल्याची बाब जनतेसमोर आणली.

आता शहरातील अविकसित रस्त्यावरील खड्ड्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देत खड्ड्यात वृक्षारोपण करीत आपल्या अनोख्या आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधले.

शहरातील मुख्य मार्ग खड्ड्याने विकसीत होऊ लागला आहे मात्र यावर एकही पक्ष तोंडातून ब्र सुद्धा काढताना दिसत नाही आहे, मात्र आम आदमी पक्षाने आता जनतेला होणाऱ्या समस्येवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

त्याचा एक भाग म्हणून शहरातील विविध भागात असणाऱ्या खड्ड्यात वृक्षारोपण करीत सत्तेत असणाऱ्या जनप्रतिनिधी यांना त्यांची जागा दाखविण्याचे काम आप ने सुरु केले आहे.

खड्ड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नामकरणाचा निषेध कार्यक्रम आप चे नेते मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात पार पडला.पावसाळी अभियान कार्यक्रम दरम्यान महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दिपक बेरशेट्टीवर, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, चंद्रपूर महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, चंद्रपूर महानगर उपाध्यक्ष सुनील सदभाय्या, चंद्रपूर महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, चंद्रपूर महानगर सहसचिव सुधीर पाटील, चंद्रपूर महानगर कुषाध्यक्ष स्वप्निल घागरगुंडे, तुकूम वॉर्ड 1 संघटन मंत्री भीमराव मेंढे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleआता पोलीसही कंत्राटी? मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे भरण्याचा निर्णय
Next articleचंद्रपूर शहरातील खड्ड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here