Home भद्रावती खळबळजनक :- आदर्श गाव असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत मधेच रंगली दारू पार्टी ?

खळबळजनक :- आदर्श गाव असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत मधेच रंगली दारू पार्टी ?

ग्रामसेवक किशोर नाईकवार आणि कर्मचाऱ्यांची गावांतील तरुणांनी केली पोलखोल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे होणार तक्रार.

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-

माजी खासदार व विद्यमान राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दत्तक घेतलेले व आदर्श गाव असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक किशोर नाईकवार व इतर कर्मचारी यांची दारू पार्टी रंगली असल्याचा खळबळजनक विडियो समोर आला असून या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे.

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गाव हे लोकवस्तीने मोठे असून या गावात मोठे राजकारण चालत असते दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तेवढे वैर नाही पण येथील ग्रामसेवक मात्र या संधीचा फायदा घेऊन जणू एकछत्री राज्य चालवतात की काय अशीच परिस्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी यांचं ग्रामपंचायत काही क्रिकेट खेळणारे तरुण यांनी पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायत मधे गेले असता तिथे दारूच्या दोन बोतल आढळून आल्या व ग्रामसेवक आता आपल्यावर आरोप होतोय म्हणून त्यांनी ग्रामपंचायत मधून पळ काढला. मात्र या सर्व घटनेचा तरुणांनी विडियो काढला असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. आता ग्रामपंचायत च्या या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थ तरुण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याने ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Previous articleस्वत:च्या मालकीची जागा असावी ही अट रद्द करुन पूरग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्या – आ. किशोर जोरगेवार
Next articleमणिपूरमधे दोन महिलांवर बलात्कार करून नग्न धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here