Home वरोरा मणिपूरमधे दोन महिलांवर बलात्कार करून नग्न धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा दया.

मणिपूरमधे दोन महिलांवर बलात्कार करून नग्न धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा दया.

आदिवासी सगा समाज कृती समिती तर्फे वरोरा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून केली राष्ट्रपतीकडे मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

देशातील मणिपूर राज्यात आदिवासी समाजातील दोन महिलांवर गैरआदिवासी लोकांनी सामुहिकपणे पाशवी बलात्कार केलेला आहे. त्या महिलांना नग्न करून जमावाने गावातून त्यांची धिंड काढली. त्यांच्या शरीराची निर्दयीपणे छेडछाड केली. ही घटना अत्यंत घृणास्पद असून, मानव जातीला कलंकित करणारी आहे. ज्या देशांमध्ये मातृशक्तीला मानाचे स्थान आहे. त्या देशातील आदिवासी समाजातील महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार निंदनीय आहे व याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे मत वरोरा येथे तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चा दरम्यान आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी व्यक्त केले.

सदर घटना ४ मे २०२३ रोजी घडलेली असून २० जुलै २०२३ रोजी व्हिडिओच्या माध्यमातून बातमी जगभरात प्रसारित झाली आहे. इतके दिवस होवूनही केंद्र आणि राज्य सरकारने याविषयी काहीच कारवाई केलेली नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश यांनी सुध्दा सरकारने योग्य कारवाई करावी अन्यथा आम्ही पाऊल उचलू’ अशी गंभीर टिपणी केलेली आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशभर समाजाच्या विविध स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मणिपूर राज्यातील कूर अमानवी घटनेबाबत आदिवासी समाजात फार मोठ्या प्रमाणात असंतोष असून देशभर मोर्चे, धरणे, आंदालन, निवेदनाच्या माध्यमातून रोष व्यक्त करीत आहेत. अशा अमानवी प्रवृत्तीच्या गुंङ लोकांना वेळीच कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळं आपणं आदिवासी समाजाच्या असल्याने व आदिवासी महिलांवरचं अत्याचार झाल्याने आपणं मणिपूर च्या त्या गुंड बदमाश लोकांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आदिवासी सगा समाज कृती समिती वरोरा च्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुम यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की मणिपूर मधे आदिवासींवर दडपशाही करणाच्या प्रवृत्तीची पाठराखण करणाऱ्या मणिपूर राज्य सरकारला बरखास्त करावे. तसेच प्रशासकिय कार्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुध्दा सेवेतून बडतर्फ करावे. पिडीत महिलांना संरक्षण देवून त्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा यासाठी राज्य सरकारला आदेशित करावे. यापुढे अशा गुन्हेगारी स्वरूपाचे महिलांवर अत्याचार होणार नाही, यासाठी कायदे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी देशातील सर्व नागरिकांची आपल्याकडे आग्रही मागणी आहे. आपण अन्यायग्रस्त, पिडीत, शोषित घटकांना न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा संपूर्ण आदिवासी समाज करत आहे अशी आर्त हाक निवेदनातून देण्यात आली आहे.

यावेळी गजाननराव मेश्राम माजी नगराध्यक्ष नगरपरिषद वरोरा,विलास परचाके सामाजिक कार्यकर्ता सुरेश मडावी ,सर अशोक कूमरे सर सुरेश टोरे सर,विजय परचाके सर,गणपत येटे,सर सुखदेव मेश्राम,सर देवराव मडावी सर,सुरेश मडावी सर,दिलीप येटे सर,प्रा.अविनाश पंधरे सर,दशरथ पेंदाम सर,दिगाबर कुळसंगे सर,सुभाष मडावी सर,रवि मसराम सर,संजय मेश्राम सर,अशोक सुरपाम सर, प्रभाकर सोयाम केळी,भास्कर तुमराम,दादा मडावी , वनिता परचाके, पुष्पा दिलीप येटे,जयश्री सुखदेव मेश्राम,भ्रांती सुरेश मडावी,दिपाली प्रल्हाद मेश्राम,दर्शना मनोज पेन्दोर,रविना महादेव मडावी,मंगला सुभाष मडावी,सुनिता येटे,सरला पेन्दोर,मिनाक्षी गेडाम,कमरे मॅडम,मसराम मॅडम. पुष्पा मंगाम,वनिता परचाके,वैशाली तोंडासे,मंदा मेश्राम,अनिता ताई मडावी,दुर्गा मेश्राम,संगिता गेडाम,छबु पेंदाम,विना किन्नाके,दीपमाला मडावी,लता आञाम,हिरा टोरे, इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleखळबळजनक :- आदर्श गाव असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत मधेच रंगली दारू पार्टी ?
Next articleचिंताजनक :- टेमुर्डा बाजारात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here