बाजारात येणाऱ्या ग्रामस्थांचे कित्तेक मोबाईल चोरी गेल्यानंतरही चोर सापडेना.
प्रतिनिधी(धनराज बाटबरवे):-
देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी यामुळे काही तरुण युवकानी रोजगारनिर्मितीचा नवा फंडा निर्माण केला असुन बाजाराच्या गर्दीत मोबाईल चोरी करण्याचा त्यांनी जणू व्यवसाय थाटला असल्याचे समोर येतं आहे. तालुक्यातील टेमुर्डा बाजारात अशाच तरुणांनी मोबाईल चोरी करण्याचा सपाटा लावल्याने बाजारात जातांना अँड्राईड मोबाईल वापरणाऱ्या ग्रामस्थांना आता आपला मोबाईल लपवायचा कुठे ? हा प्रश्न पडला आहे.
टेमुर्डा बाजारात परिसरातील मोवाडा,आसाळा,भटाळा, पाचगाव, पिजदुरा, पिंपळगाव मजरा, येन्सा मांगली व इतर पंचवीस गावचे लोक दर गुरुवारला येतात. इथे मच्छी, मटण, चिकन यासह भाजीपाला मार्केट व किराणा मोठ्या प्रमाणात खरेदी होतो, विशेष म्हणजे बकरी बोकड विक्री चा सकाळी मोठा बाजार भरतो व या बाजारात आंध्र प्रदेशचे लोक सुद्धा येतात अशातच बाजारात मोठी गर्दी होत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोर आपल्या चोरीला अंजाम देतात मात्र ज्याचा मोबाईल चोरी होतो त्यांच्यावर अख्खा बाजारच अंगलट येतो व मुकाट्याने परत गावी जावे लागते. त्यामुळं या परिसरात पोलिसांनी योग्य ती उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही कैमेरे लावावे व बाजारात येणाऱ्या ग्रामस्थांच्या मोबाईल चोरीला आळा बसवावा अशी मागणी होत आहे.