Home चंद्रपूर चंद्रपुरातील मिराज सिनेमा मल्टिप्लेक्सला मनसे ने दिला २४ तासाचा अल्टिमेट

चंद्रपुरातील मिराज सिनेमा मल्टिप्लेक्सला मनसे ने दिला २४ तासाचा अल्टिमेट

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपुरातील मिराज सिनेमा मल्टिप्लेक्सला दिला मनसेने चोप … मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा” हा चित्रपट मिराज सिनेमा येथे प्रदर्शित होऊन एक दोन हफ्ता होत आहे. तरी देखिल मीराज सिनेमा हॉलच्या दर्शनी भागावर या चित्रपटाचे कोणतीही जाहिरात अथवा पोस्टर अजून पर्यंत लावून प्रमोशन केले नाही त्या ऐवजी या मिराज सिनेमा मल्टिप्लेक्सवाल्यानी इग्रजी चित्रपटाचे पोस्टर लावलेले होते. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान देणारा प्रकार मनसे कधिस खपवून घेत नाही.. म्हणूनच आज चंद्रपूर मधील मा, सचिन भोयर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत जाऊन २४ तासाच्या आत “बायीपण भारी देवा” या चित्रपटाचे पोस्टर दर्शनी भागावर लावून प्रमोशन करा अशी तंबी देली आणि येथील मिराज सिनेमा मल्टिप्लेक्सने लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ तासाच्या आत ” बाईपण भारी देवा ” चित्रपटाचे पोस्टर दर्शनी भागावर लावले या वेळी मनसेचे सचिन भोयर व पदाधिकाऱ्यांनी मराठी लोकांची अस्मिता जपून ठेवण्यासाठी नेहमी तात्पर्य राहील असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here