Home महाराष्ट्र खळबळजनक :- महात्मा गांधीं बद्दल आक्षपार्य विधान करणाऱ्या भिडेची डिग्री खोटी ?

खळबळजनक :- महात्मा गांधीं बद्दल आक्षपार्य विधान करणाऱ्या भिडेची डिग्री खोटी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संभाजी भिडेना पण खोटं बोलण्याची सवय ? अनेक वेळा सार्वजनिक केलेले वक्तव्य व घटनांचा आढावा.

लक्षवेधी :-

महात्मा गांधी बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम द्वेष पसरविणाऱ्या शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे हे विक्रुत मानसिकतेचे असल्याचा पुन्हा एकदा पुरावा समोर आला असून “माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने पोर होतात” हया वक्तव्याने ते प्रशिद्धिच्या झोतात आले होते. खरं तर धर्मात तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना भडकविन्याची जणू त्यांनी भाजप कडून सुपारी घेतल्याची बाब आता उघड झाली असून मनोहर भिडे आत्ताच कां महाराष्ट्रभर सभा घेत आहे ? त्यांचं असं कुठलं काम आहे की त्यांची वाणी ऐकण्यासाठी लोकं येतात? खरं तर यामागे मोठं छडयंत्र असून महाराष्ट्रातील राजकीय नौटंकी जी सुरू आहे त्यावरून लक्ष हटविण्यासाठी मनोहर भिडे यांना समोर केलं जातं तर नाही ना ? असा संशय यायला लागतं आहे.

दरम्यान संभाजी भिडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे खोटं बोलत असून ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पस्तीस वर्ष भीक मागून खात होते असं ते ऑन केमरा बोलले होते व २००५ साली बोलले होते की आपण फक्त ग्रामीण शाळेपर्यंत शिक्षण घेतल आहे मग नरेंद्र मोदी यांनी अस्तित्वात नसलेल्या “Entire Political Science” या विषयात 1983 मधे डिग्री कशी केली ? हा प्रश्न उपस्थित होतं आहे व विरोधकांकडून पंतप्रधानांच्या डिग्रीवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. मोदींकडे 1983 साली मिळवलेली पदवी कुठून आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, 1992 साली मायक्रोसॉफ्टनं तयार केलेल्या फाँटची छपाई 1983 च्या मोदींच्या डिग्रीवर कशी झाली? असाही मुद्दा चर्चेत आला आहे. याचबरोबर Entire Political Science अशा विषयात मोदींनी घेतलेल्या पदवीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता मोदींच्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर स्वतःला हिंदुत्वाचा पुढारी व शिवछत्रपतींचा वारस समजणारा संभाजी भिडे यांची डिग्री सुद्धा अशीच वादग्रस्त आहे. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “Entire Political Science” हा अस्तिवात नसलेल्या विषयात डिग्री केली असल्याची खोटी माहिती समोर केली तशीच संभाजी भिडे यांनी सुद्धा केली असून भिडे यांनी अॅटॉमिक फिजिक्समध्ये डिग्री केल्याची माहिती समोर करण्यात आली मात्र “अॅटॉमिक फिजिक्स” हा विषयच मुळात त्यावेळी अस्तित्वात नव्हता अशी माहिती समोर आली आहे.

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक जावईशोध मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केला  असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र भिडे हे वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे यापूर्वीही ते अनेकवेळा चर्चेत आले आहेत. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

भिडे म्‍हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला. देशामध्‍ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्‍हणाले.

कोण आहेत संभाजी भिडे? काय खरं काय खोटं ?

मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीत राहतात. सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांच मूळ गाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. संभाजी भिडे 1980च्या दशकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’त कार्यरत होते, असं सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी सांगतात.संघाशी वाद झाल्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघाची स्थापना केली होती. 1984मध्ये संभाजी भिडे यांनी श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली.

बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगतात, असंही जोशी सांगतात. पण खरंच भिडे प्राध्यापक होते का? त्यांची संघटना श्री शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांनी असा दावा केलाय की संभाजी भिडे यांना अॅटॉमिक फिजिक्समध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. सोबतच त्यांनी असाही दावा केला ते पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.

भिडे आता महाराष्ट्रात समाजसेवा करत असून त्यांचे 10 लाखांपेक्षा जास्त अनुयायी असल्याच्या तिसऱ्या गोष्टीलाही त्यांनी दुजोरा दिला.

पण पुढील गोष्टी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं –

1. 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे.

2. ते नासाच्या सल्लागार समितीत काम करायचे

3. ते डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेटसाठीच्या 67 संशोधकांचे गाईड होते

बीबीसीने फर्ग्युसन कॉलेजची वेबसाईट तपासून पाहिल्यावर हे लक्षात आलं की कॉलेजमध्ये अॅटॉमिक फिजिक्सचा अभ्यासक्रमच उपलब्ध नाही. यानंतर आम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या अधिकाऱ्यांशी बोललो. तेव्हा भिडे या कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं सिद्ध करणारे कोणतेही रेकॉर्ड्स कॉलेजकडे नसल्याचे आम्हाला समजले. कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी हेदेखील सांगितलं की ते इथे प्रोफेसर होते, असं सांगणारेही कोणतेही रेकॉर्ड्स अस्तित्त्वात नाही. याशिवाय या कॉलेजमधून अॅटॉमिक फिजिक्सची कोणतीही डिग्री मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल रवींद्र परदेशी यांच्याशीही बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते आमच्याशी बोलले नाहीत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका लेखानुसार फर्ग्युसन कॉलेज चालवणाऱ्या संस्थेचे सदस्य किरण शाळीग्राम यांनी सांगितलं की भिडे तिथे प्राध्यापक होते, पण ते कोणत्या काळात तिथे प्राध्यापक होते, याविषयी मात्र त्यांना माहिती नव्हती.

संभाजी भिडे फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक होते, या माहितीला बीबीसीही दुजोरा देत नाही, कारण याविषयीचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही

Previous articleचंद्रपुरातील मिराज सिनेमा मल्टिप्लेक्सला मनसे ने दिला २४ तासाचा अल्टिमेट
Next articleबल्लारपूरहून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि कारचा भीषण अपघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here