Home वरोरा दखलपात्र :- कंपनीची फ्लाय अॅश मोवाडा परिसरात बेकायदेशीर टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

दखलपात्र :- कंपनीची फ्लाय अॅश मोवाडा परिसरात बेकायदेशीर टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

जवळपास नऊ शेतकऱ्यांचे धान व इतर पिकांचे नुकसान झाल्याने कार्यवाहीची मागणी.

वरोरा (धनराज बाटबरवे):-

तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील मोवाडा शेतशिवारात असलेल्या एका नाल्यांच्या जागेवर कुण्यातरी कंत्राटदाराने वर्धा पॉवर किंव्हा जिएमआर पॉवर कंपनीची फ्लाय अॅश बेकायदेशीर टाकली होती दरम्यान आता आलेल्या जोरदार पावसाने ही फ्लाय अॅश या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याच्या प्रवाहाने गेल्याने त्यांच्या शेतातील धान व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांचे अगोदरच अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असतांना आता त्यांच्या शेतात फ्लाय अॅश पसरल्या गेल्याने जमिनीच्या दर्जाचं चित्र पालटलं असून फ्लाय अॅशच्या जमिनीत शेती करायची कशी ? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळं या परिसरातील शशिकला नागभीडकर (रामजोशी ठावरी), कमलाकर पाठक, दिलीप कोटागळे, अनिल पाठक, शंकर डाहुले, जगदीश म्हरसकोल्हे, मास्तर बर्डे व फकीर कोटागळे इत्यादी शेतकऱ्यांना मौका चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here