Home चंद्रपूर चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागातील भूखंड विकणाऱ्या बिल्डरवर होणार कारवाई

चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागातील भूखंड विकणाऱ्या बिल्डरवर होणार कारवाई

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  पूरग्रस्त भागात घरे बांधल्याने दरवर्षी मोठा फटका बसत आहे. नुकत्याच आलेल्या पुरानेही प्रचंड वाताहत जलमय झाली. त्यामुळे या भागांतील भूखंड विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या. दरवर्षी नुकसानीची तीव्रता वाढतच असल्याने चौकशीनंतर कारवाईला सुरूवात होईल, असे संकेत मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिले आहेत. पूरग्रस्त भागात घरे बांधल्याने वसाहती कशा जलमय होत आहेत, चंद्रपूर शहराच्या हद्दीत मागील अनेक वर्षांपासून पुराची स्थिती निर्माण होत आहे. बिल्डरांनी पूरग्रस्त भागातील जमिनी विकत घेऊन प्लॉटस पाडले. शहरात निवासी घरांसाठी जागाच उपलब्ध नसल्याने शेकडो नागरिकांनी परिणामांची पर्वा न करता नाईलाजास्त पूरग्रस्त भागात प्लॉट घेऊन घरे बांधली. त्यामुळे इरई नदीच्या लाल व निळ्या रेषेकडे कानाडोळा करून मोठ्या वसाहती तयार झाल्या आहे. पुरामुळे या वसाहतीमध्ये पाणी शिरत असून मोठी वित्तहानी होत आहे. बिल्डरानी पूरग्रस्त क्षेत्रात प्लॉट विक्री करून मोकळे झाले. मात्र तेथील नागरिकांना आता संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्लॉट विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केली आहे. इरई नदीकाठाला लागूनच अनेक वसाहती तयार झाल्या. २०१३ मध्ये जलसिंचन विभागाने सर्वेक्षण करून नव्याने रेड झोन आणि ब्ल्यू झोन जाहीर केले. परिसरात निवासी किंवा औद्योगिक बांधकामासाठी परवानगी देऊ नये, अशा सूचना पण महानगर पालिकेला देण्यात आल्या होत्या मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

काय म्हणतात मनपा आयुक्त विपिन पालीवाल,

अवैध लेआऊट पांढुन सर्रास विक्री पुरस्त भागात येणाऱ्या अनेक शेत मालकांनी अवैधरीतीने लेआउट पाडून केवळ नोटरीवर विक्री केली. या भागात भूखंड विक्रीला परवानगी नाही. मात्र नियम धाब्यावर ठेवून विक्री करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागामध्ये भूखंड खरेदी करू नये, असे फलक मनपातर्फे लावून सुद्धा त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.अनेक अवैध वसाहती तयार झाल्या. त्यामुळे अवैध लेआउट विकण्याची माहिती काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या आहे.

चंद्रपुरातील हद्दीतील पूरग्रस्त भागात उभ्या झालेल्या वस्तीची माहीती घेतली जात आहे. पुरामुळे अनेकांना मोठा फटका बसला अशा वसाहतीची व भुखंड विक्रेत्याची चौकशी केली जाईल. व त्यानंतर नियमानुसार कारवाईस पाऊल उचल्या जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here