Home वरोरा क्राईम ब्लास्ट :- वरोरा शहरातील सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड.

क्राईम ब्लास्ट :- वरोरा शहरातील सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड.

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात आणणाऱ्या त्या टोळीचा पर्दाफाश. 2 महिला सह 11 जण पोलिसांच्या ताब्यात.

वरोरा प्रतिनिधी :-

सद्ध्या राज्यात चाललेल्या राजकीय व्यभिचारानंतर सामाजिक व्यभिचार सुद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याच्या अनेक घटना समोर येतं आहे अशातच जागतिक कीर्तीचे श्रध्येय बाबा आमटे यांचे आनंदवन ज्या वरोरा शहरालगत आहे त्या वरोरा शहरात अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात आणून सेक्स रॅकेट चालवल्या जातं असल्याचे पोलिसांच्या धाडीत समोर आल्याने या शहरातील समाजमन सुन्न झालं आहे.

वरोरा शहरात एका सुशिक्षित कॉलनी मध्ये हा सेक्स रॅकेट चा प्रकार एक महिला चालवत असल्याची चर्चा होत होती व त्यात एक अल्पवयीन मुलगी सुद्धा सामील असल्याची माहिती वार्डातील जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिली दरम्यान पोलिसांनी या अड्डय़ावर कडक नजर ठेवून संधी साधली व दोन महिलांना एका अल्पवयीन मुलीसह अटक केली मात्र अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवण्यात येऊन महिलांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीसोबत ज्या ज्या व्यक्तींनी अत्त्याचार केला त्या सर्वांची झाडाझडती घेऊन सायंकाळपर्यंत ११ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कलम 376 सह पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल होणार असुन यामध्ये काही महाविद्यालयीन मुलांचा सुद्धा सहभाग असल्याने त्यांचे शैक्षणिक सह भविष्यातील करिअर बरबाद होणार आहे.

मोठे मासे पण लागणार गळाला ?

कुठलेही सेक्स रॅकेट वा अवैद्य व्यवसाय चालवताना त्याला राजकीय व प्रशासनाचा साथ असल्याशिवाय तो व्यवसाय चालत नसते त्यामुळे यामागे कुणीतरी व कुणाचातरी हात असावा असा कयास लावल्या जातं आहे. दरम्यान ज्या ११आरोपींना पकडण्यात आले त्यासोबत आणखी काही लोक सामील असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण त्या मोठ्या माशापर्यंत पोलीस पोहचणार का ? व त्यांना सुद्धा अटक होणार का ? याबाबत शंका आहे मात्र सहाय्यक पोलीस अधीक्षक नोपानी हे अवैध व्यावसायिकांचे कर्दनकाळ ठरले असल्याने याबाबत ते कुठल्या स्तरावर पोहचवून तपास करतात यावर या प्रकरणाचे भविष्य  अवलंबून आहे.

Previous articleसनसनिखेज : API चवरे विरोधात आरोपीच्या पत्नीचा सनसनिखेज खुलासा?
Next articleचंद्रपूरच्या पूरग्रस्त भागातील भूखंड विकणाऱ्या बिल्डरवर होणार कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here