Home वरोरा सनसनिखेज : API चवरे विरोधात आरोपीच्या पत्नीचा सनसनिखेज खुलासा?

सनसनिखेज : API चवरे विरोधात आरोपीच्या पत्नीचा सनसनिखेज खुलासा?

पोलिसांनी 40 हजार रुपयांची मागणी केल्याची आणि तो पोलीस टकला असल्याचा फिर्यादीला केला व्हॉटसअप वर मेसेज

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा पोलीस स्टेशन मधे नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नसून रोज नवनवे प्रकरण समोर येत असल्याने व त्यात पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत असल्याने या पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांना “सद्रक्षणाय खलनिग्रहनाय.” या पोलीस ब्रीद वाक्याचा विसर पडला की काय ? अशी शंका निर्माण होतं आहे. दरम्यान एका आदिवासी महिलेच्या अत्त्याचर प्रकरणात API निलेश चवरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होण्याची स्थिती असतांना आता त्याचं प्रकरणात आरोपी च्या पत्नीने फिर्यादी महिलेच्या व्हॉट्सअप मेसेज मधे पोलिसांनी 40 हजार रुपये मागितले व ते पैसे टकला असलेल्या पोलिसांनी मागितले असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे API चवरे च्या विरोधात हा मोठा पुरावा सापडला आहे व त्यात चवरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होऊ शकते असे बोलल्या जातं आहे.

API चवरे विरोधात वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील नागरिकांचा मोठा रोष आहे. कारणं कुठलेही असो कुणी आपली फिर्याद घेऊन पोलीस स्टेशन मधे पोहचला की त्यां फिर्यादीला API चवरेचा मानसिक त्रास सुरू होतो व जणू तो आरोपी असल्याची परिचिती त्यां फिर्यादीला होते एवढा त्रास ते देतात अशी ओरड आहे. स्वतःला ठाणेदार पेक्षा मोठा समजणाऱ्या व सिंगम पोलीस अधिकारी म्हणून स्वतःला मिरविनाऱ्या API चवरे विरोधात अनेकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या पण स्थानिक पोलीस प्रशासनाने नेहमीच त्यांची पाठराखण केल्याने त्यांची दबंगगिरी वाढली आणि त्यांच्याकडून अनेकांना मानहानीकारक वागणूक मिळाली व अन्याय सहन करावा लागला. ज्यांनी कायदा सुव्यवस्था राखायची असते व अवैध धंद्यांना आळा बसवायचा असतो त्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी कडून पैसे घेऊन आदिवासी महिलेवर झालेल्या अत्त्याचाराला बळ दिले असल्याने पोलिसांचे हे कुठले संरक्षण ? असा प्रश्न निर्माण होतं आह.

Previous articleदेशव्यापी ओबीसी अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हाव्हे ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
Next articleक्राईम ब्लास्ट :- वरोरा शहरातील सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here