राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो व्हिडिओ भद्रावती येथील होता, एका 14 वर्षाच्या मुलीला तीन चार लोक अतिशय अश्लील प्रश्न करत होते त्या मुलीला काय उत्तर द्यावे हे देखील समजत नव्हते. त्या मुलीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावरून असे दिसत होते की ते लोक तिची खिल्ली उडवत आहे मजा घेत आहे, अशा लोकांना लगेच पोलिसात देऊन कारवाई झाली पाहिजे, दिनांक ९/८/२०२३ रोजी आम आदमी पार्टी महिला अध्यक्ष सुनीता पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार आली, तक्रारीची दखल घेऊन महिला अध्यक्ष सुनीता पाटील, महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख, महिला पदाधिकारी राणी जैन, लक्ष्मण पाटील व अजय आंबेकर यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जनबंधु मॅडम यांना निवेदन देऊन दोशींवर कडक कारवाई करून अशाप्रकारे चंद्रपूर मध्ये देखील बंगाली कॅम्प एरियामध्ये लहान मुलींना वापरून अवैद्य धंदा सुरू असल्याची माहिती देखील अतीरिक्त पोलीस अधीक्षक मॅडम यांना देण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मॅडम यांनी आपल्या निवेदनाची दखल घेऊन लगेचच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.