Home चंद्रपूर राजुरा ते सास्ती मार्गावर अपघात भरधाव वेगाने जाणा-या ट्रक चालकाने तिघांना चिरडले....

राजुरा ते सास्ती मार्गावर अपघात भरधाव वेगाने जाणा-या ट्रक चालकाने तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई-वडील व मुलगी यांचा जागीच मृत्यू

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर – राजुरा  :-   राजुरा ते सास्ती मार्गावरील धोपटाळा गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणा-या ट्रक चालकाने तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई-वडील व मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी ०८,०० ते ०८,३०,  च्या सुमारास घडला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची माहिती येथील नागरिक देत आहे.

धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे निलेश वैद्य वास्तव्याने राहत होते. सकाळी आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी ते काम आटपून घरी येत असताना घरापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ राजुरा कडून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकला धडक दिली धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा चकानाचुर झाला. तर समोर याच ट्रकने दोन मोटार सायकलस्वारांना धडक दिली यात रामपुर येथील दोघेही जखमी असून जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Previous articleहर घर तिरंगा उपक्रम उत्सव म्हणुन साजरा करा – आ. किशोर जोरगेवार
Next articleचंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक सेनेत मोठे फेरबदल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here