Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक सेनेत मोठे फेरबदल 

चंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक सेनेत मोठे फेरबदल 

वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी उमाशंकर तिवारी व महेश वासलवार यांची नियुक्ती.

चंद्रपूर :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मागील काही महिन्यांपासून अनेक फेरबदल झाले असुन पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने बहुचर्चित वाहतूक सेनेचे नेत्रुत्व फेरबदल करण्याचे संकेत होते दरम्यान वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र सैनिक सुधीर खापने यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांचा काही दिवसांपूर्वी चंद्रपूर दौरा झाला होता व त्यात त्यांनी जिल्ह्याचं वाहतूक सेनेचे नेत्रुत्व कुणाकडे द्यायचे यांची चाचपणी केली होती, त्यात पक्षाचे कट्टर महाराष्ट्र सैनिक महेश वासलवार व जनहित कक्षाचे जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी यांची पक्ष संघटन वाढविण्याची प्रामाणिक इच्छा बघता त्यांच्याकडे जिल्ह्याचे वाहतूक सेना विभागाचे नेत्रुत्व देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रयत्नाने वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक व सरचिटणीस आरिफ शेख यांनी उमाशंकर तिवारी व महेश वासलवार यांची तीन तीन विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

भद्रावती येथील उमाशंकर तिवारी यांचा ट्रान्सप्लांट क्षेत्रात असलेला अनुभव व पक्षासाठी त्यांनी आतापर्यंत दाखवलेली उपस्थिती बघता त्यांच्याकडे वरोरा-भद्रावती, चिमूर नागभीड व ब्रम्हपुरी शिंदेवाही सावली या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली असुन महेश वासलवार यांच्याकडे चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली. या दोघांच्या नियुक्ती मुळे पक्ष संघटनेला बळकटी मिळणार असुन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे ताकतीने लढल्यास वाहतूक सेनेचा मोठा फायदा पक्षाच्या उमेदवारांना मिळेल असे बोलल्या जातं आहे. दरम्यान उमाशंकर तिवारी व महेश वासलवार यांच्या नियुक्ती बद्दल मनसे नेते राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापने, जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनदीप रोडे, विधी कक्ष विभागाच्या राज्य चिटणीस अँड मंजू लेडांगे, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, चंद्रपूर शहर अध्यक्ष सचिन भोयर,जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश काळबांधे, पीयूष धुपे, विजय तुर्क्याल इत्यादींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here