Home चंद्रपूर महावितरणचे नियम बदले : जुने घरांचे बिल नवीन मालकाला भरावेच लागणार

महावितरणचे नियम बदले : जुने घरांचे बिल नवीन मालकाला भरावेच लागणार

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  जुने घर घेत असताना अनेकजण त्या घराच्या वीज जोडणीच्या बिलाबाबत गाफील असतात. मात्र आता याकडे लक्ष ध्यावेस लागणार आहे. जुन्या घरमालकाने थकित ठेवलेले वीजबिल नवीन घरमालकाकडून ही वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे जुने घर घेताना प्रथम वीज बिल भरले की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे.

१ ऑगस्टपासून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ग्राहकांनी वीज बिल थकित ठेवले आहे. अनेक ग्राहक घर विकून मोकळे झाले आहे. त्यामुळे आता वसुलीतील तफावत भरून काढण्यासाठी महावितरणने कठोर पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता जुने घर खरेदी करताना जरा जपून करणे आवश्यक आहे.

                   थकबाकी कोट्यवधीची

मागील काही वर्षामध्ये जिल्ह्यात वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणने विविध पथकांच्या माध्यमातून वीज कट करण्याची मोहीम राबविली. असे असले तरी जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आजही ग्राहकांकडे आहे.

वीजबिल थकबाकी चे काय आहे. कारण?

एकदा का वीजबिल थकीत ग्राहकाची वीज कापली की त्या ग्राहकाकडे डबल महावितरण चे लोक जाऊन बघत नाही आणि बघितले तरी ते मेन लाईनला आकडा टाकून विज चोरी करत असताना आढळून दिसते तरीपण या ग्राहकावर कारवाई करण्या ऐवजी महावितरण मधील काही कर्मचारी त्यांच्याकडू शुल्लक पैसे घेऊन दुर्लक्ष करत असतात अशी नागरिकांची तक्रार आहे. परिणामी वीज कापलेल्या ग्राहकांच्या फायदा होत असतात आणि महावितरणच्या तोटा तरी महावितरण अधिकाऱ्यांनी अश्या जीवबिल कापलेल्या ग्राहका साठी एक मोहीम चालवून क** कारवाई करावी अशी सुरळीत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची मागणी आहे.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक सेनेत मोठे फेरबदल 
Next articleधक्कादायक :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचा ऑनलाइन तिकीट घोटाळा वनअधिकाऱ्यांच्या मर्जीने ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here