Home भद्रावती राष्ट्रवादीचे सुधाकर रोहनकर यांच्याकडून शेतकऱ्याची फसवणूक?

राष्ट्रवादीचे सुधाकर रोहनकर यांच्याकडून शेतकऱ्याची फसवणूक?

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  राष्ट्रवादी काँग्रेस चे भद्रावती तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी गौतम वानखेडे यांची धानोली येथील सर्व्हे क्रमांक 252 आराजी 0.75 है. आर ही शेतजमीन 50 लाखांत विकत घेतली मात्र त्यांनी केवळ 22 लाख नगदी व 3 लाखांचे सहा महिन्यांनंतर चे चेक देऊन उर्वरित 25 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करीत असल्याने व पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी देत असल्याने पिडीत शेतकरी गौतम वानखेडे यांनी त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत जिल्हा उपनिबंधक व राष्ट्रीय अनुसूचीत जाती व जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती चंद्रपूर येथील प्रेस क्लब येथे घेतलेल्या 22 आगस्ट च्या पत्रकार परिषदेत दिली.

मौजा धानोली येथील सर्व्हे क्रमांक 252 आराजी 0.75 है. आर ही शेतजमीन गौतम वानखेडे यांनी तिथे प्लाट पाडून विकण्यासाठी तहसीलदार भद्रावती यांच्याकडे सन 2019 मध्ये एन ए ( निवासी प्रयोजनासाठी अकृषक करिता ) मंजुरी साठी अर्ज दाखल केला होता. त्या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-5 अन्वये त्यांना तहसीदार भद्रावती यांच्याकडून जून 2019 ला नोटीस मिळाला होता. दरम्यान वानखेडे हे पैशाअभावी सदर शेतजमीन अकृषक करण्यास असमर्थ ठरल्याने व कर्जबाजारी झाल्याने सुधाकर रोहनकर ओळखीचे आहेत म्हणून ले आऊट पडण्यासाठी त्यांना गहाण पत्र करून पैसे मागितले परंतु सुधाकर रोहनकर यानी तुझ्या शेतीवर मी 50 लाख देतो पण तू लिहून दे असे म्हटले व वानखेडे यानी ती शेती विक्री करून दिली. या दरम्यान रोहनकर यांनी शेती रजिस्ट्री करून घेऊन वानखेडे यांना केवळ 22 लाख रुपये नगदी व तीन लाखांचे सहा महिन्यांनंतरचे पोस्ट देटेड चेक दिले पण 25 लाख रुपये मात्र दिले नाही व पैसे मागायला गेले असता तुझ्याच्याने जे होते ते कर ती शेती माझी आहे जास्तं केलास तर जिवनिशी ठार करेन अशी धमकी देत असल्याने पिडीत शेतकरी वानखेडे यानी याबाबत तक्रार दाखल करून दिनांक 22/8/2023 ला पत्रकार परिषदेत मला न्याय मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.यावेळी पिडीत शेतकरी गौतम वानखेडे यांच्यासह मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, गुलाबराव गुलघाने इत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here