Home चंद्रपूर जनता महाविद्यालय येथे ” मेरी माटी मेरा देश ” उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण...

जनता महाविद्यालय येथे ” मेरी माटी मेरा देश ” उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम


अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  स्थानिक चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित जनता महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ” मेरी माटी मेरा देश ” या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जनता महाविद्यालय
संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. के. महातळे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. के. सी. पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर बलकी, प्रा. जी. आर. येरगुडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रासेयो स्वयंसेवक शंकर बोंडे आणि क्रांतीविर सिडाम यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous articleसाईबाबा मंदिरचे पुजारी रामप्रसाद मसादे यांच्या साईबाबा सिव्हील लाईन येथील घराचे अवैध बांधकाम?
Next articleराष्ट्रवादीचे सुधाकर रोहनकर यांच्याकडून शेतकऱ्याची फसवणूक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here