Home चंद्रपूर जनता कॉलेज चौकातील नाली देत आहे अपघाताचे आमंत्रण

जनता कॉलेज चौकातील नाली देत आहे अपघाताचे आमंत्रण

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  नागपूर रोड जनता कॉलेज चौकासमोरील हायवेला लागून असलेल्या नालीचे स्लॅब पूर्णपणे पडलेले आहे. आणि मुख्य म्हणजे याच नालीसमोर अत्यावश्यकअशे दुकाने सुद्धा आहे.जसे मेडिकल, झेरॉक्स, किराणा दुकान आणि खाद्यपदार्थाचे दुकान सुद्धा आहे त्यामुळे येथील नागरिकांचे येण्या-जाण्याचे मुख्य मार्ग तोच आहे. आणि त्या नाली वरचे स्लॅब पूर्ण खचून पडल्यामुळे येथील नागरिकांना हे नाली अपघाताचे आमंत्रण देत आहे. तरी येथील म,न,पा प्रशासनाला किंवा पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनाचे लक्ष कसे का गेलेले नाही हे आश्चर्य आहे. असे वाटत आहे की या नाली मध्ये जोपर्यंत कोणताही प्रकारच्या अपघात घडत नाही तोपर्यंत चंद्रपुरातील मनपा प्रशासन किंवा पीडब्ल्यूडी च्या अधिकारी या नालीकडे लक्ष देणार नाही असे चित्र दिसत आहे. कारण या परिसरात चंद्रपूरातील प्रसिद्ध साई बाबा मंदिर व जनता कॉलेज सुद्धा आहे आणि या चौकातील नेहमी एजा करताना विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिक जास्त प्रमाणात असतात इतका मोठा रहदारीचा चौक असताना सुद्धा प्रशासनाला जाग केव्हा येईल याकडे येथील विद्यार्थी विद्यार्थिनींचे व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Previous articleचंद्रपुरातील पोलीस रिश्वत घेताना अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात
Next articleलक्षवेधक :- कसा असेल वरोरा शहराचा विकास आराखडा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here