Home वरोरा लक्षवेधक :- कसा असेल वरोरा शहराचा विकास आराखडा ?

लक्षवेधक :- कसा असेल वरोरा शहराचा विकास आराखडा ?

वरोरा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच राजू कुकडे यांनी मनसे तर्फे मांडला वरोरा शहराचा विकास आराखडा.

वरोरा :-

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाळासाहेब आंबेडकर, वरोरा शहराचे नाव आनंदवन या अधिष्ठानाच्या रूपाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं असे पद्मश्री, श्रद्धेय बाबा आमटे यांच्या स्म्रुतिना प्रथम मी अभिवादन करतो. महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठी मनाची धडकन हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरोरा शहराचा हा विकास आराखडा मी राजू कुकडे आपल्यापुढे सादर करतो,

वरोरा शहरातील माझ्या समस्त बंधू भगिनिनो आणि मातांनो, वरोरा शहराचा हा विकास आराखडा आपल्यापुढे सादर करतांना मला खूप आनंद होत आहे, कारण वरोरा शहर हे पत्रकारिता, कला साहित्य क्षेत्रांनी व पद्मश्री बाबा आमटे यांच्या कर्मभूमी असलेल्या आनंदवन या अधिष्ठानामुळे जागतिक दर्जाचे नावलौकिक मिळवलेलं शहर आहे. या शहरात झाडीबोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले कविवर्य, साहित्यिक ना. गो. थुटे यांची कर्मभूमी आहे तर राज्यातील प्रख्यात व्यंगचित्रकार जयवंत काकडे सुद्धा याच भूमीतून आपली कला प्रसारमाध्यमांवर प्रसारित करत आहे.

वरोरा शहराच्या सभोवताल वीज निर्मिती कंपन्या, कोळसा खाणी, आयर्न कंपनी व मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्र असुन या कंपन्यांचा केवळ सीएसआर फंड जरी या शहराला मिळाला तरी या शहराचा चेहरामोहरा बदलून जाऊ शकतो एवढे औधोगिक क्षेत्र आहे. परंतु येथील उद्धोगात स्थानिक भूमिपुत्रांना डावलून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोकांना रोजगार मिळाला असुन राजकीय लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांनी आपल्यां सोयीनुसार या कंपन्यांकडून स्वहित जोपासले आणि स्थानिक भूमिपुत्र तरुण बेरोजगार यांना वाऱ्यावर सोडले, यात कंपन्यांचा सीएसआर फंडाचा पैसा सुद्धा शहराच्या विकासासाठी पूर्णता वापरला गेला नाही, पर्यायाने आज सर्वांगसुंदर वरोरा हे नावारूपास येण्यास पात्र असलेलं शहर अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासलं आहे.

“वरोरा जिल्हा” म्हणून सरकारने घोषित करावा यासाठी अनेक सामाजिक संघटना व राजकीय नेते मागणी करत आहे, पण वरोरा शहर जिल्हा ठिकाण म्हणून विकशित करण्याची राजकीय इच्छाशक्ती कुणाकडे आहे ? यांचा पण विचार करायला हवा, कारण शहराचं दिसणं नव्हे तर असणं आवश्यक आहे आणि भौगोलिक द्रुट्या वरोरा शहर त्या पद्धतीने घडवायला हवे, आपल्याकडे केवळ चर्चेत राहण्यासाठी एखादी मागणी केल्या जाते, पण त्यासाठी आपल्याकडे कुठला विकास आराखडा आपण तयार केला आहे का ? आज एवढ्या समस्या आपल्यापुढे आ वासून उभ्या ठाकल्या असतांना त्यांवर ना लोकप्रतिनिधी उपाय शोधताहेत ना येथील प्रशासनव्यवस्था काही करायला तयार आहे, मग नुसती जिल्ह्याची मागणी करण्यात काय अर्थ आहे ?

माजी कॅबिनेट मंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांनी पहिल्यांदा पालकमंत्री होताच वरोरा शहराला मी सिंगापूर करून दाखवीन अशी घोषणा केली होती, पण आपलं दुर्भाग्य, वरोरा शहर सिंगापूर होता होता समस्यांपूर कसं झालं हेच कळलं नाही. वरोरा नगरपरिषदेच्या आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांना मूलभूत सुविधेसह शहराचा पायाभूत विकास करता आला नाही, कारण त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नव्हती व , दुरद्रुष्टीकोण नव्हता, पर्यायाने एवढी वर्ष सत्ता भोगून सुद्धा सत्ताधाऱ्यांनी मूलभूत समस्या सुद्धा सोडवल्या नाही, 1972 ची पाणी पुरवठा योजना अजूनही अखेरच्या घटका मोजत आहे, पण नवा पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य आणि केंद्राच्या दफ्तरात धूळखात पडला असताना सत्ताधारी यांचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.त्यामुळे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, एवढंच नव्हे तर शहरातील अर्ध्या भागातील नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा योजनाच पोहचली नाही,

शहरात पूर्णता पक्के रस्ते नाही, जे रस्ते बनले ते सिमेंट रस्ते उखडले आहे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या नाल्या पूर्णता तयार करण्यात आल्या नाही, पर्यायाने सांडपाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. नगरपरिषद तर्फे नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळतं नाही, कारण नगरपरिषद चा दवाखानाचं नाही, त्यामुळे मूठभर सत्ताधारी यांच्या नाकर्तेपणामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून आपण दूर गेलो आणि सत्ताधारी यांचं फक्त चांगभलं झालं. मग या शहराला कुठला पक्ष? कुठली सत्ता ? चालना देऊ शकते? असा प्रश्न शहरातील सर्वसामान्य जनतेला पडला असेल,, त्यांवर एकच पर्याय “महाराष्ट्र नवनिर्माण सेना”, कारण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचं स्वप्न हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बघितलं व त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर कुठल्याही राजकीय पक्षाला आजवर जमलं नाही असा “महाराष्ट्राचा विकास आराखडा” मांडला त्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विकास आराखड्यातील स्वप्नांची पूर्तता काही अंशी का होईना आम्ही महाराष्ट्र सैनिक वरोरा शहरात करू इच्छितो व वरोरा शहराला केवळ पायाभूत सुविधाच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक द्रुश्टीने रचनात्मक विकास साधण्याचं महंत कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे.

शहरात चौका चौकात सौंदर्यीकरण. शहरातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून नव्याने पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करून तो शासनाकडून मंजूर करण्याचे युद्ध स्थरावर प्रयत्न,, सांडपाणी अंतर्गत गटार लाईन टाकून शहराच्या बाहेर त्यांचे समायोजन करण्याची यंत्रणा विकसित करण्याची योजना. गांधी तलावाचे पर्यटन स्थळ म्हणून सुशोभीकरण, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, विद्यार्थ्याना आयएएस, आयपीएस व एमपीएससी परीक्षेतून अधिकारी निर्माण करून देणारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी अद्यावत अभ्याशिका, घनकचरा व्यवस्थापणाची आधुनिक पद्धतीने अंमलबजावणी व त्यातून जैविक खत निर्मिती, भूमिगत गटार लाईन टाकून व प्रदूषणावर मात करून गटारांच्या पाण्याचे शुद्धीकरण आणि त्या शुद्ध पाण्याचा शेतीसाठी वापर, शहरात मोठे सांस्कृतिक सभागृह, गांधी उद्यानाचे सुशोभीकरण, ध्यानसाधना आणि योगासन करण्याकरितां विशेष व्यवस्था, शहराचा बाजार वार्ड, नवीन वस्ती व मालवीय वार्ड येथील परिसरात कायमस्वरूपी जागेचे पट्टे व त्यांवर घरकुल योजना राबवून तो परिसर विकशित करण्याचा संकल्प.

कुठलाही विकास साधायचा असेल तर दुरद्रुश्टी हवी व त्याला रचनेची आणि सौंदर्यद्रुष्टीची जोड असेल तरचं तो विकास चिरंतन टिकेल, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले बघितले असतील, इंग्रजकालीन बांधलेल्या वास्तू बघितल्या असतील किंव्हा गोंडराजा काळातील चंद्रपूरचे चार दरवाजे व चार खिडक्या बघितल्या असतील, त्या वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत मोठ्या दिमाखदारपणे उभ्या आहेत, पण आपण बांधलेले रस्ते, नाल्या व शहरात केलेले सौंदर्यीकरण फार काळ टिकत नाही, कारण आपल्याकडे प्रत्तेक कामात सत्ताधारी यांची कमिशन खाण्याची जी प्रथा रूढ झाली आहे, त्यामुळे कुठलेही बांधकाम करतांना कंत्राटदारांकडून सत्ताधारी पैसे खातात त्यामुळे कामाचा दर्जा खालावतो व मग निकृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असते आणि ते बांधकाम दीर्घकाळ टिकत नाही, मग त्यांची डागडुजी करण्यासाठी पुन्हा टेंडर काढली जातात व त्यात सुद्धा सत्ताधारी पैसे खातात त्यामुळं निरंतर भ्रष्टाचार होत असल्याने शहराच्या विकासाचे तीनतेरा वाजतात,

शहराचा विकास केला नाही म्हणून शहरातील नागरिक सत्ताधारी यांच्या नावाने बोंबा मारतात, पण केवळ बोंबा मारल्याने आपण आपले कर्तव्य पार पाडतो का ? तर नाही. कारण जेंव्हा जेंव्हा निवडणुका होतात तेंव्हा तेंव्हा आपण आपला लोकप्रतिनिधी कसा असावा? यांचा विचार करत नाही तर तो उमेदवार आम्हच्या जातीचा आहे, धर्माचा आहे व त्यांच्याकडून पैसे मिळाले म्हणून मतदान करतो, एवढेच नाही तर निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षातर्फे जाहीरनामा प्रकाशित केल्या जाते त्यातील आश्वासनाला आपण बळी पडत असतो, पण मागील पाच वर्षांपूर्वी याच पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने त्या पक्षाच्या सत्ताधारी यांनी पाळली आहेत का? याबद्दल आपण कधी त्यांना प्रश्न विचारत नाही, आपण दिलेल्या टॅक्सचा पैसा सत्ताधाऱ्यांनी कुठे वापरला यांचा हिशोब पण आपण कधी त्यांना मागत नाही, कारण आपल्याला याबद्दल काही घेणंदेणंचं नाही,

नगरपरिषद व इतर निवडणुका फक्त एक लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो, महत्वाची बाब म्हणजे “देशात विकले न जाणारे आमदार खासदार व नगरसेवक हवे असतील तर प्रथम विकला न जाणारा मतदार तयार होणे गरजेचे आहे, कारण आपली निवडणुकीत पैशांनी विकली जाणारी लाचारी हेच भ्रष्टाचारांच मुळ कारण आहे त्यामुळं आपण या गंभीर प्रश्नावर विचार करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे विकास करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे व नवनिर्माणाचे स्वप्न आहे त्याच पक्षाला संधी मिळायला हवी, आजवरचे सत्ताधारी व राजकारणी बघता वरोरा शहराचं नवनिर्माणाचं कार्य केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातूनचं होऊ शकते हा विश्वास मी निश्चितपणे आपणांस देऊ शकतो.

मागील अनेक वर्षांपासून तेच ते पक्ष आणि तेच ते सत्ताधारी सत्तेत आल्याने वरोरा शहराचा विकास साधला जातं नाही, कारण त्यांच्याकडे शहराच्या विकासाचा आराखडा नाही व राजकीय इच्छाशक्ती नाही, कारण आपण बघत आहो की येथील राज्यकर्ते फक्त सत्ता कशी मिळेल याचेच गणितं मांडतात, व सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता मिळवतात पण सर्वसामान्य जनतेच्या जीवनात यामुळे काही एक फरक पडतो का? ते आहेत तिथेच आहे पण यांची आलिशान, बंगले उभी राहतात, हे मग लेआउट च्या धंद्यात पैसे गुंतवतात व मोठमोठ्या कंपन्यांत ठेकेदारी मिळवतात आणि गब्बर होतात. आपण शहरातील नागरिक मात्र केवळ टॅक्स भरत राहतो आणि मग वार्डात अतिवृष्टीने पाणी साचलं, नाल्या कोम्बल्या, रस्ते उखडले की नगरपरिषद सदस्य व सत्ताधारी यांच्या नावाने संताप व्यक्त करतो, पण आपला हा संताप निवडणुकीच्या वेळी का उफाळून येतं नाही ? हा गंभीर प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे.

वरोरा शहराच्या मध्यभागी ऐतेहसिक असा तलाव आहे जवळपास 26 एकरात बसलेला हा तलाव मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून स्वतःचे सौंदर्य हरपून बसला आहे. इथे फक्त गणपती, दुर्गादेवी व शारदादेवीचे विसर्जन होते पण जर या तलावाचे खोलीकरण व पर्यटनस्थळांच्या दुश्टीने सौंदर्यीकरण केले तर येथील भोई बांधवाना मोठ्या प्रमाणात मच्छीमारी व शिंगाडे उत्पादन करता येईल व जे पर्यटक आनंदवन येथे येतात तेचं पर्यटक व शहरातील लोक येथे आल्याने इथे रोजगाराच्या फार मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तरुण बेरोजगारांना आपला छोटासा व्यवसाय इथे उभा करता येऊ शकतो, पण एवढी मोठी कल्पनाशक्ती व दुरद्रुष्टी यापूर्वीच्या सत्ताधारी किंव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे होती का? या प्रश्नाचे उत्तर नाहीच असेल,

त्यामुळे या शहराचं भविष्य घडवायचे असेल तर महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हे स्वप्न पूर्ण करण्याची किमया आहे, पण ती किमया केंव्हा दिसेल? जेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता वरोरा नगरपरिषद मध्ये आपण द्याल तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे नाशिक महानगरपालिकेंची पाच वर्ष सत्ता होती त्या सत्ताकाळात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी नाशिक शहराचा जो कायापालट केला त्यामुळे भारतातील स्मार्ट सिटी म्हणून नाशिक शहराचा उल्लेख केल्या जातो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वरोरा शहराचा विकास नाशिक च्या धर्तीवर आपण करू शकतो. यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या रस्ते बांधकाम आराखडा बघा.

आपल्या शहरातील पाणी पुरवठा योजनेतून नागरिकांना जे पाणी दिल्या जातंय त्यांची अवस्था बघा, 1972 पासूनच्या या पाणी पुरवठा योजनेत शहरातील नागरिकांना जे पाणी मिळतं ते शुद्ध मिळतं नसल्याने नागरिकांना खाजगी आरओ मधून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एवढी वर्ष ज्या पक्षातील नेत्यांनी नगरपरिषद मध्ये सत्ता मिळवली ते शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी देऊ शकले नाही ही शोकांतिकाचं म्हणावी लागेल. पण या संदर्भातील नाशिक महानगरपालिकेने मनसे च्या सत्ताकाळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवला ते बघा. .. .. .. .

शहरात मोठ्या प्रमाणात घनकचरा गोळा करून तो यार्डवर जमा केल्या केल्या जातो, पण घनकचऱ्यातून खत निर्मिती प्रकल्प मात्र उभा राहिला नाही, या संदर्भात नाशिक महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन कसं केलंय ते बघा. .. .. .. .. ..

वरोरा शहरातील सांडपाणी व्यवस्थापन व त्यांवर नियंत्रण नाही, त्यामुळं पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येतंय व ते आरोग्याच्या द्रुश्टीने धोकादायक आहे पण नगरपरिषद प्रशासनाने यावर कुठलीही उपाययोजना केलेली नाही मात्र याबाबत नाशिक महानगरपालिका प्रशासनाने सांडपाणी यावर काय उपाययोजना केली ते बघा. .. .. .. .. .. .. ..

आपल्याकडे गांधी उद्यान बगीचा आहे, तिथे काही प्रमाणात विकास साधला गेला आहे, पण याहीपेक्षा आपण वेगळं काही करून शहरातील जेष्ठ नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी नाशिक च्या बोटॅनिकल गार्डन च्या पार्श्वभूमीवर रमणीय स्थळ म्हणून आपण विकशित करू शकतो. ते कसं विकशित केलंय ते बघा. .. .. .. ..

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपले दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी मंदिर बांधू अशी घोषणा केली होती परंतु ते मंदिर तर झाले नाही पण त्यांच्या स्म्रुतिचा ठेवा सुद्धा जपला नाही, त्यामुळे बाळासाहेबांवर श्रद्धा असणाऱ्या शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाला पण नाशिक महानगरपालिकेच्या मनसेच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मारक तयार करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीची प्रतिक्रुति व इतर ऐतिहासिक वस्तूंचे एक उत्तम संग्रहालय तयार करण्यात आले त्याचा व्रुतान्त बघा. .. .. .

वरोरा शहराचा हा विकास आराखडा शहराची दशा आणि दिशा बदलवून या शहराला ऐतेहसिक दर्जा प्राप्त करून देऊ शकते व शहराच्या पायाभूत विकासासह सामाजिक, सांस्कृतिक, औधोगिक व शैक्षणिक विकास करून शहराचं नवनिर्माण होऊ शकते ते नवनिर्माणाचं कार्य करण्यासाठी आपल्या अमूल्य अशा मदतीचा गरज आहे, नवनिर्माणाच्या या कार्यात आपण आपल्या सूचना व अभिप्राय नोंदवून सहभागी व्हा, आणि हे शहर केवळ जिल्ह्यात आणि राज्यातचं नव्हे तर देशात एक आगळंवेगळं शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्याच्या नवनिर्माणाच्या कार्यात आपण निश्चितपणे सहभागी व्हाल व शहराच्या ऐतीहासीक विकासात आपले अमूल्य असे योगदान द्याल या अपेक्षेसह जय हिंद, जय भीम, जय पेरसापेन, जय मल्हार, जय महाराष्ट्र. .. .. .. .

Previous articleजनता कॉलेज चौकातील नाली देत आहे अपघाताचे आमंत्रण
Next articleवरोरा शहराचा विकास आराखडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here