Home चंद्रपूर साई मंदिराचे पुजारी रामप्रसाद मसादे यांच्या हातून अघटित का होतंय ?

साई मंदिराचे पुजारी रामप्रसाद मसादे यांच्या हातून अघटित का होतंय ?

अनेक ठिकाणी अतिक्रमण व बेकायदेशीरपणे बांधकाम करून आपले दुकान व घर थाटणारे मसादे यांच्यावर एका शिक्षिकेच्या अपघात प्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही.

चंद्रपूर प्रतिनिधी:-

देशात आणि राज्यात ज्या साईबाबाची महिमा कोट्यावधी साईभक्तांच्या मुखात असुन ते मंदिरात येतांना भक्तीत तल्लीन होतात त्याच साईबाबांच्या मंदिरात एका पुजारी असणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून स्वतःच्या स्वार्थासाठी जर एखादे अवैध बांधकाम बांधकामामुळे व त्यांच्या चुकीच्या रचनेमुळे अपघात होऊन कुणाचा जीव जातं असेल तर मग अशा पुजाऱ्यांच्या पूजेने साईबाबा प्रसन्न होतील का ?, हा प्रश्न निर्माण होत आहे. “सबका मलिक एक” असे भक्तांना आश्वस्त करणारे साईबाबा त्यांच्या पुजाऱ्यांच्या भ्रष्ट प्रव्रुत्तिमुळे जर कुणाचं अघटित होत असेल तर काय अशा पुजाऱ्यांना साई भक्तांनी जवळ करावं असं वाटतंय ? आपले दुःख निवारण व्हावे आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे म्हणून साईबाबांच्या मंदिरात आपले डोके ठेवणारे भक्त जर त्याच मंदिरात पुजाऱ्याच्या चुकीमुळे जीवाला मुकत असतील व कुणाला नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर मग ते पुजारी नेमकी कशासाठी पूजा करतात ?, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा ठाकते आहे.

साई मंदिराचे पुजारी रामप्रसाद मसादे यांचे नागपूर महामार्गावर गाड्यांचे आलायमेंट व टायर विक्रीचे गायत्री टायर नामक दुकान आहे आणि ते दुकान महामार्गाच्या सर्विस रोडवर आहे त्यामुळं आलायमेंट झालेल्या गाड्या मागे घेताना महामार्गावर वेगाने चालत असलेल्या जडवाहतूक करणाऱ्या गाड्या व दोन चाकी चार चाकी गाड्या पाहूनच रिवर्स घ्यायला हव्या पण अगोदरच सर्विस रोड वर आलेल्या दुकानातून स्कॉर्पिओ गाडी काढताना त्यामागे स्कूटीवरील शिक्षिका महिलेला वाटलं की ही गाडी अंगावर येईल तर ती घाबरली आणि मागून येणाऱ्या भरधाव असलेल्या एका ट्रक च्या खाली येऊन तिचा अपघात झाला आणि ती मरण पावली दरम्यान तिच्या अपघाताला गायत्री टायर चे मालक रामप्रसाद मसादे व स्कॉर्पिओ गाडी चालक जबाबदार आहे हे स्पष्ट असताना पोलिसांनी केवळ त्या गुन्हा नसलेल्या ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला व पुजारी यांना सोडून देण्यात आले असल्याची माहिती आहे.

खरं तर कुठल्याही मंदिराचा पुजारी हा त्या मंदिरात आलेल्या भक्तांच्या प्रार्थनेचा देवाकडे साकडं घालण्याच्या प्रक्रियेत एक दुवा असतो कारण त्यांनी आणलेली पूजेची सामुग्री ही पुजाऱ्याच्या माध्यमातून देवाला अर्पण केलंय जाते पण त्याच पुजाऱ्याच्या माध्यमातून काही अघटित होत असेल तर मग त्या पूजेचे काय ? असा प्रश्न पडतो. दरम्यान साईबाबा मंदिराचे पुजारी रामप्रसाद मसादे यांचे चित्र आणि चरित्र जर बघितले तर त्यांनी खरंच साईबाबांच्या मंदिरात पूजा करावी का ? असा प्रश्न उपस्थित होतो. रामप्रसाद मसादे हे पुजारी अगोदर काय होते आणि आता एवढे कोट्याधिश कसे झाले याचे कार्यवृत्त येणाऱ्या काळात कळेलच पण त्यांच्या सर्विस रोडवर आलेल्या दुकानामुळे त्याठिकाणी एका शिक्षिकेचा करून अंत झाला आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचं आभाळ कोसळलं, त्यांचं दुःख हे कुणी कमी करू शकत नाही. पण रामप्रसाद मसादे यांनी आपल्या स्वार्थासाठी रस्त्यावर दुकानदारी थाटून असे अघटित प्रकार का करावे ? अगोदरच यांचे जाण्यायेण्याच्या मार्गावर गायत्री दुकान न्यायालयाच्या निकालाने तुटले आता परत तीच चूक त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यावेळी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे त्या जागेचा पट्टा मागण्यासाठी अगदी खोटी माहिती देऊन प्रशासन व न्यायालय यांची दिशाभूल केली होती, एवढेच नव्हे तर स्वतःच्या घराचे मंजूर प्लॅन नुसार बांधकाम नकरता अतिरिक्त बांधकाम केले त्यामुळं अशा खोटारड्या पुजाऱ्यावर कुणाची कृपा आहे हे कळायला मार्ग नसून भक्तांचे दुःख दूर करणारे साईबाबा त्यांच्या पुजाऱ्याविषयी कुठला विचार करत असतील? याबद्दल कुतूहल वाटतं आहे.

Previous articleचक्क शाळेतस केली चोरांनी चोरी चंद्रपुरातील या शाळेत झाली चोरी
Next articleभीषण अपघात भरधाव ट्रक ने बस ला मागून धडक 11 जणांचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here